हिमायतनगर, अनिल मादसवार| शहरातील वॉर्ड क्रमांक १ मधील बजरंग चौकातील जेष्ठ महिला नागरिक, सर्वांना काकू म्हणून परिचित असलेल्या लतिकाबाई बाबुराव बोडके यांचं दि.२३ फेब्रुवारी रोजी दुःखद निधन झालं. हि बातमी समजताच गुरुवारी दि.२४ रोजी हदगाव - हिमायतनगर तालुक्याचे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी बोडके सरांच्या निवास्थानी भेट देऊन कुटुंबीयांचं सांत्वन करून धीर दिला.
मृत्यू हा अटळ आहे, एक ना एक दिवस सर्वांना देवाच्या घरी जायचा आहे. म्हणून मिळालेल्या मनुष्य जीवनात काहीतरी चांगलं करून जावं. हि भावना ठेऊन हातपाय चाललेपर्यंत आपल्या मुलाबाळांच्या प्रमाणे अंगणवाडीत येणाऱ्या प्रत्येक चिमुकल्या बालकांचा सांभाळ करणारी मातोश्री, बजरंग चौकातील काकू सौ.लतिकाबाई बोडके यांचं दुःखद निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर बुधवार दि.२३ रोजी बोरगडी रोडवर असलेल्या वैकुंठधाम हिंदू स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मृत्यू पश्चात पती, दोन मुले, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या बाबुराव बोडके यांच्या पत्नी, ग्रामसेवक अनिल बोडके व शिक्षक राजेश बोडके यांच्या मातोश्री होत्या.
त्यांनी १९८० पासून खाजगी शाळा व त्यानंतर शासनाच्या अंगणवाडीतील चिमुकल्याना खाऊ वाटपापासून ते ज्ञान दाणाच्या माध्यमातून कार्य केलं. त्यांचे हे कार्य सर्वांच्या आठवणीत कायम राहणारे आहे. अचानक त्यांचं निधन झालं आणि सर्वांचे मन गहिवरून आले. काकूंचे निधन झाले म्हंटलं तर कोणाला विश्वास न बसणारी गोष्ट होती. तरी नियतीपुढे आपले कोनाचे काहीच चालत नाही हे सर्वानी मान्य करावं लागलं.
आई गेल्या आता आमच्या डोक्यावरून मायेचा हात कोण..? फिरविणार असं म्हणत गहिवरून येत दोन्ही मुलांनी मन मोकळं केलं. कोणतीही अडचण आल्यास मी आहे.... असे म्हणत आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी धीर देत बोडके कुटुंबीयांचं सांत्वन केलं. यावेळी माजी जी.प.सदस्य सुभाष दादा राठोड, शहराध्यक्ष संजय माने, माजी तालुका प्रमुख जनार्धन ताडेवाड, प्रकाश कोमावार, विठ्ठलराव वानखेडे काका, जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड, पंडित ढोणे, योगेश चिलकावार, गायके, कात्रे यांच्यासह, अनेकांची उपस्थिती होती.