उस्माननगर, माणिक भिसे| उस्माननगर व परिसरात पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेअंतर्गत२७ रोज रविवारच्या पहिल्या टप्प्यात चांगला प्रतिसाद मिळाला...
० ते ५ वर्षापर्यंतच्या लहान बालकांना पल्स पोलिओ लस देण्यासाठी पोलिओ लसीकरण केंद्रावर सकाळपासूनच गर्दी दिसून आली. संपूर्ण जिल्ह्यात ग्रामीण भागातही आरोग्य खात्यातील अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी, मदतनीस, सेविका, कर्मचारी ,सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी पूर्ण केला. पल्स पोलिओ लसीकरणा पासून कोणतेही लहान बालक वंचित राहू नये यासाठी जातीने काळजी घेतली जात होती.
लहान बालक वंचित राहू नये म्हणून एसटी बस स्टॉप वर तसेच अंगणवाडी,शाळा, येथे लसिकरणाचे बुथ उघडण्यात आले होते.तसेच आरोग्य कर्मचारी बाहेरगावाहून येणाऱ्या जाणाऱ्या लहान बालकांना पोलिओ पाजण्याचे व्यवस्था करण्यात आली होती. वैद्यकीय अधिकारी डॉ.नंदगावे , सभापती, सरपंच, तसेच ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार गणेश लोखंडे, लक्ष्मण कांबळे यांच्या हस्ते लहान बालकांना लस पाजून या मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला.
उस्माननगर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत सर्व पल्स पोलिओ लसीकरण केंद्रांना डॉक्टर नंदगावे यांनी भेटी दिल्या पल्स पोलिओ मोहीम यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी सेविका, मदतनीस परिश्रम घेत आहेत.आय.पी.पी.आय.कार्यक्रमा अंतर्गत जे लहान मुले या लसिकरणापासून वंचित राहिले,त्यांना प्रत्यक्ष गृहभेटीव्दारे कर्मचाऱ्या मार्फत ग्रामीण भागात तीन दिवस प्लस बांधण्यात येत असल्याचे सांगितले.