औरंगाबाद| दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त संचालक माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय आणि माहिती केंद्र, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहाय्यक संचालक (माहिती) वंदना थोरात यांनी आचार्य जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी माहिती अधिकारी मीरा ढास, माहिती सहायक संजीवनी जाधव, प्रदर्शन सहायक राजेंद्र वाणी, छायाचित्रकार जॉन चार्ल्स, सुभाष पवार, चंद्रकला दाभाडे, गणेश सुरासे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.