माळाकोळी,बालाजी नागसाखरे| लोहा तालुक्यात येणाऱ्या मौजे माळाकोळी पासून जवळच असलेल्या आसपुर व रिसनगाव या गावात 9 ऑक्टोबर 2019 रोजी दुपारी चारच्या सुमारास वीज पडून दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ,
याविषयी सविस्तर माहिती अशी की, माळाकोळी पासून जवळच असलेल्या मौजे रिसनगाव तालुका लोहा येथील बालाजी बापुराव पवार वय वर्षे 40 राहणार रिसनगाव तालुका लोहा यांच्या दुपारी चारच्या दरम्यान शेतात काम करत असताना वीज पडून मृत्यू झाला ते दुसऱ्याच्या शेतात मंजुरीने गेले असता वैजनाथ पवार यांच्या शेतात काम करत असतानाही वीज पडली व त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
दुसरी घटना आष्टुर तालुका लोहा येथील महिपती दत्तराव मेहत्रे वय वर्षे एकोणीस राहणार आष्टुर यांचा माधव म्हेत्रे यांच्या शेतात काम करत असताना दुपारी चारच्या दरम्यान वीज पडून मृत्यू झाला. दुपारी साडे चारच्या दरम्यान अचानक आलेल्या गडगडाटी पावसामुळे या दोन व्यक्तीचा वीज पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.