प्रा.मुकुंद बोकारे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा -NNL

नविन नांदेड।श्री.मनोविकास जुनियर कॉलेज कंधार येथील सेवानिवृत्त विद्यार्थी प्रिय प्राध्यापक तथा शैक्षणिक चळवळीत अनेक शिक्षकांच्या व प्राध्यापकांच्या शैक्षणिक हक्कासाठी व न्यायासाठी सतत लढा देणारे सेवानिवृत्त प्राध्यापक  प्रा.मुकुंद बोकारे सर यांचा वाढदिवस आज इंदिरा गांधी ज्युनियर कॉलेज येथील क्रीडा शिक्षक प्राध्यापक डॉक्टर रमेश नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साजरा केला. 

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिडको वाघाळा शहर ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष विनोद कांचनगिरे हे होते तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा सहसचिव मुख्याध्यापक संघटना प्रा.मोतीभाऊ केंद्रे, श्री, गोपाळ पेंडकर, (नांदेड जिल्हाध्यक्ष शिक्षकेतर संघटना ) श्री वर्तळे, सिडको वाघाळा ब्लॉक कांग्रेस चे कार्याध्यक्ष राजु लांडगे, देविदास कदम, प्रा. डॉ. ललिता शिंदे, सुनील शिंदे, प्रा. शशिकांत हाटकर, प्रभू उरुडवड, विशाल गायकवाड( कराटे मास्टर) जाधव, सौ. काविता चव्हान, सौ. कामतीकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा.डॉ. रमेश नांदेडकर व विद्यार्थ्यांच्या वतीने मान्यवरांचा शाल,पुष्पहार, देऊन सत्कार करण्यात आला.

व तदनंतर प्रा. मुकुंद बोकारे यांच्या हस्ते केक कापून व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून वाढदिवस अतिशय थाटामाटात साजरा करण्यात आला. यावेळी राजू लांडगे प्रा.शशिकांत हाटकर प्रा. डॉ.रमेश नांदेडकर यांनी मनोगत पर प्रा.मुकुंद बोकारे  यांनी आजवर केलेल्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा गौरव करून  त्यांना पुढील उदंड आयुष्य लाभो यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.रमेश नांदेडकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.शशिकांत हाटकर यांनी मानले.

हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी शेख सोहेल, मुन्ना कोकरे, मिसाळे, तारू, सिद्धू मोटरगे, कु. दिपाली गिरी, शकुंतला, नरवाडे, मगरे, जयस्वाल, यांच्या सह पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण घेणारे जवळपास साठ विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी