नविन नांदेड। क्लासिक स्पोर्ट्स एण्ड हेल्थ केअर अकैडमीचा वतीने आमदार चषक टेनिस बाल किक्रेट खुले सामान्यांचे उद्धाटन नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे व मान्यवरांच्या हस्ते सिडको येथील इंदिरा गांधी मुलींची प्राथमिक शाळा सिडको येथील मैदानावर २० फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता संपन्न झाले.
आमदार चषक क्रिकेट टेनिस बॉलचे आयोजन क्लासिक स्पोर्ट्स व हेल्थ केअर अकडमी चा वतीने आमदार चषक सामने आयोजीत करण्यात आले होते,या स्पर्धेत प्रथम पारितोषिक ५५ हजार५५५ हजार ,दुसरे२२,२२२,तिसरे अकरा हजार एकशे अकरा व विविध पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन आ.हंबर्डे,व पक्षप्रभारी संतोष पांडागळे, उपमहापौर अब्दुल गफार, नगरसेवक श्रीनिवास जाधव,युवा नेते उदय भाऊ देशमुख, पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड,माजी नगरसेवक सिध्दार्थ गायकवाड, अशोक मोरे, वाघाळा शहर ब्लाक काँग्रेस कमिटीच्ये अध्यक्ष विनोद कांचनगिरे, नगरसेवक प्रतिनिधी वाजीद भाई, अंबादास रातोळे, माजी नगरसेविका सौ ललीता शिंदे,कविता चव्हाण,जगदीश भुरे,यांच्या सह मान्यवरांच्या उपस्थितीत होती.
यावेळी नगरसेवक व ब्लाक काँग्रेस कमिटी मध्ये शुभारंभ सामना घेण्यात आला, नगरसेवक संघांनी हा सामना जिंकला, या चषक मध्ये नांदेड शहरासह जिल्ह्यातील विविध तालुक्यातील व परिसरातील जवळपास ६० संघांनी नाव नोंदणी केली.
सुत्रसंचलन राजु लांडगे,तर आभार प्रदर्शन अल्पसंख्याक दक्षिण अध्यक्ष शेख अस्लम यांनी केले. या शेख अशफाक, गौतम भालेराव, बालाजी माने, सचिन मगर,रोहीत रेवणवार, मोहम्मद माज,शेख सोकद,शेख शाखेर,सचिन जिलहेवाड,मोहीत बेदी,श्रीकांत कांबळे,मंहमद शकील.महमद सुनिल,मंहमद अखतर यांच्या सह संयोजन समितीने परिश्रम घेतले.