हिमायतनगर तालुक्‍यात नव्याने जिल्हा परिषद गट तर दोन पंचायत समिती गण वाढणार -NNL

आगामी होणाऱ्या निवडणुकांकडे सर्वच पक्षाच्या मातब्बर नेत्यांचे लक्ष 


हिमायतनगर, अनिल मादसवार|
हिमायतनगर शहराला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यानंतर एक जिल्हा परिषद गट व दोन पंचायत समितीचे गण कमी झाले होते. त्यामुळे ग्रामीण भागातील विकासाची गती कमी होऊन अनेक अडचणी निर्माण होत होत्या. हि बाब लक्षात घेऊन नगरपंचायतीच्या निर्मितीत पुढाकार घेणाऱ्या आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी पुन्हा नव्याने एक जिल्हा परिषद गट आणि दोन पंचायत स्मीता गट निर्मितीसाठी प्रयत्न सुरु केले आहे. लवकरच हिमायतनगर तालुक्यात तिसरा जिल्हा परिषद गट आणि दोन पंचायत समितीच्या गणात वाढ होणार आहे. त्यामुळे निवडणूक लढविण्यासाठी ईच्छुक असलेल्या राजकीय व्यक्तीमध्ये समाधानाचे वातावरण तयार झाले आहे. आता नव्याने  होणाऱ्या गटात आणि पंचायत समिती गणात कोणती कोणती गावे राहणार..? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. नुकतेच दि.१२ फेब्रुवारी रोजी या संदर्भाचा अहवाल निवडणुक आयोगाकडे सादर करण्यात आला असून, नियमानुसार ज्या ठिकाणहून गावची रचना सुरु व्हायला होती. त्या दक्षिण उत्तर ठिकाणाहून गावाचा समावेष झाला नाहीतर या संदर्भात काहीजण याचिका दाखल करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. 

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्‍यात पुर्वी हिमायतनगर- सिरंजनी, सरसम - सवना, कामारी - दुधड यात ३ जिल्हा परिषद गट आणि ६ पंचायत समितीचे गण होते. यापैकी काही जिल्हा परिषद व पंचायत समितीवर काँग्रेसचे वर्चस्व होते. यावेळी सुद्धा तालुक्यात जिल्हा परिषद एक गट आणि दोन पंचायत समिती गण वाढणार असल्याची चर्चा होती. त्या अनुषंगाने नुकतेच हिमायतनगर महसूल विभागाकडून सर्व्हे करून तीन गट आणि सहा गणाचा अहवाल निवडणूक आयोगाला दि.१२ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आला आहे. हि माहिती तालुक्यातील राजकीय वर्तुळात पसरताच आपला जिल्हा परिषद गट कोणता, पंचायत समिती गण कोणता, आणि कोणकोणती गावे कोणत्या भागात येतील याबाबतची चर्चा तालुकाभर चौकाचौकात सुरु आहे. 

एक जिल्हा परिषद गट आणि दोन पंचायत समिती गण वाढणार असल्यामुळे आपला नंबर लागणार म्हणून शिवसेना, काँग्रेस, भाजपासह इतर सर्वच पक्षाच्या ईच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून आगामी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केल्याचे भजती गाठीवरून दिसून येत आहे. सध्यातरी गट व गणाची निर्मितीचा निर्णय लागला नसल्याने आणि जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पूर्वी होणारे आरक्षण जाहीर झाले नसले तरी नावायने निर्माण होणाऱ्या गट व गणकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर  आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अनेकांनी आत्तापासूनच तयारी सुरु केली असून, विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे, लागण, नाट्यविधी आदी ठिकाणी उपस्थित होऊन आपले वर्चस्व सिद्ध करण्यात मागं असल्याचे चित्र पाहावयास मिळते आहे. 

मागील महिन्यात तालुक्यातील सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुका सुरु आहेत. त्यामध्ये अनेक  ग्रामीण भागातील निवडणूका बिनविरोध झाल्या. तरी कांही गावात सोसायटीच्या निवडणुकीने चांगलाच रंग भरला होता. मात्र या सर्वच सेवा सहकारी सोसायटींमध्ये सध्याच्या अवस्थेत तरी संचालकाना भत्ते तर सोडाच बसायला जागा देखील नाही. पाच वर्षात सोसायटीची ईमारत उभी राहिल की..? नाही, अशी वास्तविकता सोसायटीच्या भंगार झालेल्या इमारतीला पाहिल्यावरून दिसून येत आहे. सोसायटींची अवस्था खंडर सारखी झाली असली तरी नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँके, बाजार समिती, खरेदी- विक्री संघ निवडणुकीला मतदानांची संधी मिळेल. आणि नशीब असले तर या निवडणुकिच्या रिंगणात उतरण्याची संधी मिळेल. या आशेवर अनेक राजकीय पक्षातील कार्यकर्ते आपापल्या परीने तयारी करत असल्याचे चित्र दिसत आहे. नुकत्याच झालेल्या सोसायटीच्या निवडणुकीत काँग्रेसला अतिआत्मविश्वास नडल्याने यापुढील निवडणुकीसाठी डोळ्यात तेल घालून काँग्रेस तयारी करत आहे. तर सोसायटी जिंकल्यामुळे शिवसेनेत उत्साह संचारला असल्याचे दिसते आहे. आगामी जिल्हापरीषद, पंचायत समिती निवडणुकावर डोळा ठेवुन पुढाऱ्यांनी देखील या निवडणुकाकडे लक्ष घालून पुढील निवडणुकाची पायाभरणी सुरु केली आहे. 

आजघडीला हिमायतनगर तालुक्यातील जिल्हा परीषद, पंचायत समितीच्या निवडणुकीचा गाजावाजा सुरु झाला आहे. त्यातच नवीन गट व गण होणार असल्याने गावो गावी निवडणुकीच्या चर्चेला उधान आले आहे. हिमायतनगर शहरातील नगरपंचायतीसह जिल्हा परीषद निवडणुक एकाच वेळी लागतील असे अनेकजण बोलून दाखवीत आहेत. तालुक्‍यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती काँग्रेसच्या ताबयात असून, विधानसभेवर देखील काँग्रेसचे आमदार आहेत. एकेकाळी सतत १५ वर्ष हदगाव-हिमायतनगर विधानसभा शिवसेनेच्या ताबयात होती. त्यानंतर दर ५ वर्षाला विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-शिवसेना अशी उलथापालथ होते आहे. त्यामुळे आगामी विधानसभा आपल्या ताब्यात राहावी यासाठी आता काँग्रेसचे आ.माधवराव पाटील जवळगावकर, शिवसेनेचे माजी आ.नागेश पाटील आष्टीकर, बाबुराव कदम कोहळीकर गटासह राष्ट्रवादी, भाजपा, वंचित, एमआयएम यासह सर्वच पक्षांच्या पुढार्‍यानी लक्ष केंद्रित केले आहे. त्यापैकी काही पक्षाच्या मातब्बर राजकीय वर्गांनी आगामी काळात होणार्‍या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, त्यानंतर विधानसभेच्या संभाव्य निवडणुकीकडे सर्व ताकदीनिशी लक्ष ठेऊन आत्तापासूनच रणनीती आखात असल्याचे दिसून येत आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी