पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती
नांदेड| नुकत्याच झालेल्या नायगाव, अर्धापूर व माहूर नगरपंचायत निवडणुकीत निवडून आलेले काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक , अर्धापूर, नायगाव नगरपंचायत नगराध्यक्ष , उपाध्यक्ष यांचा सत्कार व काँग्रेसच्या डिजिटल सभासद नोंदणी अभियान कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार, दि. १८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३:३० वाजता कुसुम सभागृह येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आ. अमरनाथ राजूरकर यांनी आज येथे दिली.
जिल्ह्यात पायाभूत सुविधा , शिक्षण, सिंचन, आरोग्य आदी सर्वच क्षेत्रात पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात गतीने विकास कामे करण्यात येत आहेत . या कामाची पावती जनतेनी नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत दिली आहे. अर्धापूर, नायगाव नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसला एकहाती सत्ता तर माहूर नगरपंचायत निवडणुकीतही काँग्रेसने गतवेळेच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. या नगरपंचायत निवडणुकीत निवडून आलेले काँग्रेस पक्षाचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक तसेच नायगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. गीता जाधव, उपनगराध्यक्ष विजय चव्हाण तसेच अर्धापूर नगरपंचायतचे अध्यक्ष छत्रपती कानोडे उपाध्यक्ष यास्मीन सुलताना यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
तसेच डिजीटल सदस्य नोंदणी अभियानाचे आयोजन पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. यावेळी माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर ,माजी खा.सुभाष वानखेडे , माजी मंत्री डी. पी. सावंत , आ. माधवराव पाटील जवळगावकर ,आ. मोहनअण्णा हंबर्डे, आ. जितेश अंतापूरकर , माजी. आ.ईश्वरराव भोसीकर , जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व माजी आ. वसंतराव चव्हाण ,माजी आ.हणमंतराव बेटमोगरेकर , माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, माजी आ. अविनाश घाटे ,जि. प. अध्यक्षा सौ.मंगारानी अंबुलगेकर, महापौर सौ.जयश्री पावडे, जिल्हा परिषदेचे शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, समाजकल्याण सभापती अॅ्ॅड. रामराव नाईक, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, महिला व बालकल्याण सभापती सौ.सुशीलाताई बेटमोगरेकर, उपमहापौर अब्दुल गफार, स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी, सभागृह नेते अॅड. महेश कनकदंडे, महिला व बालकल्याण सभापती सौ.संगीता पाटील डक, उपसभापती गीतांजली हटकर, आदींची उपस्थिती राहणार आहे.
कोरोनाचे सर्व नियम पाळून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व जि. प. सदस्य ,नगरसेवक , पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आ. अमरनाथ राजूरकर, व नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी केले आहे.