नांदेड| पंचायत समिती नांदेड अंतर्गत पिंपळगाव कोरका संकुलाच्या वतीने शिक्षणविस्तार अधिकारी रोटे यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श विद्यालय टिळकनगर येथे आयोजित शिक्षण परिषदेस शिक्षकांचा उत्सूफूर्त प्रतिसाद मिळाला.
आयोजीत शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख बळिराम फाजगे,तर प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक बोडके,श्रीनिकेतन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ.सौ.एस.एन राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमात सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून शिक्षण परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.
शिक्षण परिषदेत शिक्षण आपल्या दारी, शंभर दिवस वाचन उपक्रम, डिजिटल स्वाध्याय, अभ्यासमाला 2.0, चला शिकूया प्रयोगातून विज्ञान,गोष्टीचा शनिवार,शिकू आनंदे, आझादी का अमृत महोत्सव, रिड टू मी अप्पा बाबत, ज्ञानगंगा उपक्रम वैज्ञानिकांच्या जयंत्या,स्तर निश्चिती, मिशन आपुलकी, आरोग्यवर्धिनी कार्यक्रम उभारी...चल घे भरारी, निष्ठा 3.0 ,आई बाबा ची शाळा प्रशिक्षण, आदी विषयावर साधनव्यक्ती म्हणून एम.एस.पाटील, पी.एम.फुलवरे, पी.एस.,हिरेमठ .श्रीमत शेळके मॅडम, गायकवाड सर यानी मार्गदर्शनात अध्यापनाचे विविध पैलू सांगून शिक्षकांना शिक्षण परिषदेत मंत्रमुग्ध केले.
यावळी केंद्रप्रमुख बळीराम फाजगे, मुख्याध्यापक बोडके, मुख्याध्यापिका डॉ.सो.एस. एन.राऊत, यांनी मार्गदर्शन केले.सुत्रसंचलन शिक्षक आयनेले यांनी तर उपस्थितीतांचे आभार केंद्रप्रमुख फाजगे यांनी मानले .शिक्षण परिषदेस संकुल पिंपळगाव को.मधिल सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक मोठ्या संख्येने ऊपस्थित होते.