जि.प.ने कायद्याची अंमलबजावणी करावी-ऍड.कॉ.प्रदीप नागापूरकर -NNL


नांदेड। ग्राम पंचायत कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने कायदे व शासन निर्णयाची अंमलबजावणी करुन असंतोष दूर करावा, असे आवाहन कामगार नेते ऍड.कॉ.प्रदीप नागापूरकर यांनी केले.

ग्राम पंचायत कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी महासंघ शाखा नांदेडच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर बेमुद्दत धरणे व त्यानंतर घेराव आंदोलन  आजपासून सुरु केले आहे. यावेळी बोलतांना ऍड.कॉ.नागापूरकर म्हणाले की, ग्रा.पं. कर्मचार्‍यांच्या मागण्या न्याय व कायदेशिर आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून संघटनेच्यावतीने वारंवार या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. 

जिल्हा परिषद प्रशासनाने कर्मचार्‍यांच्या मागण्यांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करुन कायदे व शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी कॉ.के.के. जांबकर, कॉ.शिवाजी फुलवळे, कॉ.देवराव नारे, एआयएसएफची विद्यार्थींनी अर्चना सूर्यवंशी, कॉ. प्रकाश बैलकवाड, कॉ. नागोराव येताळे यांची भाषणे झाली. यावेळी थकीत राहणीमान भत्ता, दहा टक्क्यांचा अनुशेष तातडीने भरावा, भविष्य निर्वाह निधी कर्मचार्‍यांच्या खात्यात जमा करावेत, कामावरुन कमी केलेल्या कर्मचार्‍यांना तात्काळ कामावर घ्यावे आदी मागण्यांच्या गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. 

या आंदोलनात कॉ.हनमंत मगरे, कॉ. शिवाजी शेजुळे, कॉ. हर्षवर्धन आठवले, कॉ. गणेश शिंदे, कॉ.परसराम मुंडे, कॉ. बाबाराव जाधव, कॉ. नागोराव पुयड, कॉ. पांडूरंग पावडे, कॉ.माधव भिसे, कॉ.बाबुराव जोगदंड, कॉ.रावसाहेब धोत्रे, कॉ. शंकर चव्हाण, कॉ.वामन हटकर, कॉ.बालाजी शिंदे, कॉ.शेख सरदार, कॉ.गिरे देविदास, कॉ.गणेश सातेवाड, कॉ.गणेश शिंदे, कॉ.भगवान वाघमारे, कॉ. शिवाजी राठोड, कॉ. नयुम पठाण यांच्यासह ग्राम पंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी