नांदेड। शासकीय विश्रामगृह नांदेड येथे श्री.राष्ट्रीय राजपूत करणी सेना ची बैठक दि.20.02.2022रोजी पार पडली. यावेळी नांदेड येथील सामाजिक कार्यकर्त्या व सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सौ.गीता शंकर सिंह ठाकूर यांनी राष्ट्रीय राजपूत करणी सेनेत प्रवेश केला.
यावेळी श्री.राजपूत करणी सेना च्या मराठवाडा प्रसिद्धी प्रमुख सौ.पूजा गणेशसिंह बिसेन,नांदेड जिल्हा उपाध्यक्ष मीना हजारी,शहराध्यक्ष महेश ठाकूर,नांदेड येथील निर्भिड पत्रकार तथा लोकहित लाईव्ह न्यूज संपादक मा.साहेबराव कोलंबिकर,पत्रकार मारोती शिकारे,पत्रकार शंकर सिंह ठाकूर आदी उपस्थित होते.
सौ.गीता ठाकूर यांना आई दुर्गा देवीची ओढणी,पुष्पहार, पुष्गुच्छ देऊन श्री.राजपूत राष्ट्रीय करणी सेनेत प्रवेश देऊन स्वागत करण्यात आले.सौ.ठाकूर यांनी करणी सेना मध्ये प्रवेश केल्याने त्यांचे मित्र परिवार व अनेक सामाजिक संघटनांनी स्वागत केले आहे.या प्रवेश बाबत सर्व मित्र परिवारा कडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.