हदगाव,शे चांदपाशा| शहरात नागरिकांना किंवा समोरच्या वाहनांना सावध करण्यासाठी व त्याचे लक्ष वेधण्यासाठी हार्नचा वापर करण्यात येतो त्यासाठी कमी आवाजाचे हार्न वाहनाच्या कंपन्या लावतात माञ ते हार्न काढुन त्या जागी कर्णकर्कश विचिञ कानठळ्या बसावे अश्या आवाजचे हार्न टूव्हिलर वर लावयायचे काही वाहनधारकात चढाओढ लागते आहे.
यामुळे नागरिकांचे माणसिक आरोग्य बिघडवत आहे. अश्या वाहनावर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे या मुळेनागरिकांची डोकेदुखी वाढलेली असुन काही हुल्लडबाज टपोरी मुलाकडुन असे हार्न लावले वाजविले जात असल्याचे पाहयायला मिळत आहे. या मुळे रहदारीच्या ठिकाणी किवा वळणाच्या ठिकाणी हार्नचे बटन दाबला जातो. तेव्हा रहदारीच्या ठिकाणी वारंवार हार्न वाजवितांना दिसुन येतात. यामुळे रूग्णालयात जाणारे पेशट जेष्ठ नागरिक नवजात बालके तसेच पक्षाना याचा आतिशय ञास होताना दिसुन येत आहे सर्व नियम धाब्यावर बसवुन असे हार्न बसविण्यात येत आहे.
बालक बनतात चालक.... हदगाव शहरात बालक व युवक आपली वाहने सुसाट वेगाने चालवतांना दिसुन येतात इतकेच नव्हे. तर अनेका कडे वाहन चालविण्याचे लायसन्स पण नसते अनेक बालक सुसाट वेगाने वाहने चालवतांना दिसुन येतात. तर युवक पण सुसाट वेगाने वाहने चालवीत आहे. स्टटबाज युवकावर कारवाई होने अपेक्षित असतांना पोलिस कारवाईचा बडगा उचलताच या मध्ये राजकीय हस्तेक्षेप होतांना दिसुन येतो. यामुळे पोलिस पण थातुर मातुर कारवाई करत आहे हे आवर्जून उल्लेख करावा लागेल.
शहरात चिडीमार पथक अवश्यक.... शाळा महाविद्यालये सुटल्यावर तामसा टी पाईट राठी चौक मौ.आझाद चौक कृ.उ.बा, समिती जिनिग परिसर कला महाविद्यालये व जि.प हायस्कुल पोलिस स्टेशनच्या मागे या भागात शाळा काँलेज सुटल्यावर गर्दी होते यावेळी काही धानड्य व्यक्तीची मुले... टुव्हिलरवर हार्न वाजवुन सुसाट वेगाने वाहने चालवत ना दिसुन येतात.
विशेष म्हणजे अश्या युवकांच्या विरोधात कोणी तक्रार करण्यास कोणी ही पुढे येत नाही. परिणाम स्वरुप या चिडीमार युवकांचे चागलेच फावते आहे हदगाव शहरातील शाळा महाविद्यालच्या मुली मध्ये पोलिसानी महीला पोलिसांचे मोबाइल क्रमांक देवुन त्यांना विश्वास दियायला हवा की तक्रार करणा-या मुली मुलाचे नाव जाहीर करण्यात येणार नाही. पण हदगाव पोलिस स्टेशनला पोलिस बल कमी असल्याने आपु-या पोलिस संख्या मुळेच या बाबतीत कोणी तक्रार ही करत नसल्याचे दिसुन येत आहे हे विशेष.