नागलगाव ग्रा.पं.तील घरकुलांसाठी जि.प.समोर भाकपचे धरणे आंदोलन -NNL


नांदेड।कंधार तालुक्यातील नागलगाव ग्रामपंचायत अंतर्गत पंतप्रधान आवास योजने अंतर्गत 528 पैकी 410 कष्टकरी नागरिकांना डावलल्याच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने आज जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांना भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने दिलेल्या निवेदनात कंधार तालुक्यातील डोंगराळ भाग असणार्‍या कुरुळा सर्कल मधील नागलगाव ग्रामपंचायती सर्वात मोठी गट ग्रामपंचायत आहे. ऊस तोड कामगार, शेतमजुरांची या भागात मोठी संख्या आहे. पंतप्रधान आवास योजनेसाठी 528 गरजूंनी रीतसर अर्ज केले असता 118 अर्जांच्या यादीचे प्रजासत्ताक दिनी वाचन करण्यात आले 410 कोटी ची यादी पाहता ग्रामस्थांकडून मोठ्या प्रमाणात विरोध दर्शविण्यात आला. 

वाचन करण्यात आलेल्या 118 अर्जामध्ये शासकीय कर्मचार्‌यांच्या घरातील व्यक्तींचा समावेश आहे, शिवाय एकाच कुटुंबातील 2-3 व्यक्तींची नावे समाविष्ट असून गत 1-2 वर्षापूर्वीच घरकुल योजनेचा लाभ घेतलेल्या असंख्य व्यक्तींची नावे आहे मोठ्या महानगरांमध्ये घरे बांधून स्थानिक झालेल्या व्यक्ती ,मोठे शेतकरी व गावांमध्येच पक्के बांधकाम असणार्‌या व्यक्तींची नावे समाविष्ट करण्यात आली असून खरे शेतमजूर, ऊसतोड कामगार यांना राहण्यासाठी निवास नसणार्‌यांना डावलण्यात आले आहे सदरील यादीही तुरटीचे असून फेर तपासणी करून यादी जाहीर करावी. 

पंतप्रधान आवास योजने चा निधी वाढवून द्यावा. घरकुल लाभार्थ्यांना शासनाकडून रेती पुरवठा करण्यात यावा. महापालिके प्रमाणे कर्ज देऊन मध्यम उत्पन्न गटाची घरकुल योजना राबवून कर्ज उपलब्ध करून देत सबसिडी देण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर ऍड.कॉ. प्रदीप नागापूरकर, कॉ.शिवाजी फुलवळे, कॉ. अर्जुन पवार कॉ.दत्ता काळेवार, कॉ.अशोक पवार, आनंद वाघमारे, भरत पवार, विकास पवार, परमेश्वर खाडे, लालू राठोड, ऋषिकेश चव्हाण, माधव पवार, रघुनाथ राठोड, फुलसिंग राठोड, धोंडिबा राठोड, रमेश पवार, कुलदीप पवार, ज्ञानेश्वर राठोड, शिवाजी राठोड आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी