वर्धा -यवतमाळ -नादेड रेल्वे मार्गाच्या संबधी संसदेत प्रश्न मांडणार - खा हेंमत पाटील -NNL


हदगाव,शे चांदपाशा|
विदर्भ व मराठवाड्याला जोडणा-या वर्धा - यवतमाळ -नादेड या संथगतीने सुरु असलेल्या रेल्वे मार्गाला गतिमान करण्यासाठी संसदेत विशेष प्रश्न लावुन धरु अस हिगोली लोकसभाचे खा. हेंमत पाटील या़नी सांगितलं.

ते दि.३१ जानेवारी रोज सोमवारी तामसा येथे आयोजित राजे नोवसाजी नाईक व त्यांचे सहकारी स्वतंत्र योद्धे यांच्या स्मृती सोहळा निमित्तानं आले असता पञकारांशी माहीती देतांना बोलत होते. ते पञकारांना विविध विषयी वरिल माहीती देतांना म्हणले की, बिकानेर  [राजस्थान ] येथे गेलो असता महाराष्ट्र राज्यातील स्वतंत्र लढ्याचे अनेक दस्तावेज तिथे जतन केले असल्याचे पहिले आहेत. स्वातंत्र्य लढ्याचा    इतिहास आजच्या पिठीला प्रेरणा देणारा आहे. खरा इतिहास समाजा समोर येण्याची अपेक्षा ही त्यांनी पञकारांशी बोलतांना व्यक्त केली. याच बरोबर त्यांनी पञकारांच्या विविध प्रश्नांला त्यांनी उत्तरे दिली. 

वर्धा -यवतमाळ - नादेड रेल्वे प्रकल्प....?

हदगाव तालुक्याच्या  विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणारा हा रेल्वे प्रकल्प केवळ मराठवाडा व विदर्भातील आमदार खासदाराच्या एकजुट अभावी गेल्या १२ वर्षापासुन रखडल असुन, या रेल्वे प्रकल्पला केद्रशासनाचा ६०% व राज्य शासनाचा ४०%  टक्के निधी वाटा असुन, ११ फेब्रुवारी २००९ ला तात्कालिक रेल्वेमंञी लालुप्रसाद यादव याच्या हस्ते या रेल्वे प्रकल्पाचे भुमिपुजन झाले होते.

तेव्हा २७४ कोटी ५३ लाख मुळ किमत असलेला हा प्रकल्प अंदाजे आडीच हजार कोटीवर गेल्याच अस जाणकार सागत आहे. विशेष म्हणजे हदगाव तालुक्यात एक ही उध्योग नाही. त्यामुळे रोजगाराच्या शोधात पुणे मुबई हैद्राबाद अन्य राज्यात इथल्या रोजगारांना जाव लागत. हे लोकप्रतिनिधीचे अपयश स्पष्ट दिसुन येत आहे. या बाबतीत आमदार खासदारांनी या जीवलग प्रश्नवर एकजूट दाखावावी अशी मागणी जनतेतुन होत आहे .



 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी