महाडिबीटी पोर्टलवर शिष्‍यवृत्‍तीसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ -NNL


लातूर|
लातूर विभागातील अधिनस्त नांदेड, लातूर, उस्मानाबाद व हिंगोली या जिल्ह्यातील सर्व शासन मान्‍यता प्राप्‍त अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयाचे प्राचार्य आणि या महाविद्यालया मध्‍ये प्रवेश घेतलेल्‍या अनुसूचित जाती, विमुक्‍त जाती भटक्‍या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी,2020-21 साठी पुन्हा अर्ज (Re-apply) करण्‍यासाठी तसेच2021-22 या वर्षासाठी भारत सरकार शिष्‍यवृत्‍ती (GOI), शिक्षण शुल्‍क, परीक्षा शुल्‍क (FREESHIP), राजर्षी शाहू महाराज गुणवत्‍ता शिष्‍यवृत्‍ती, व्‍यावसायिक पाठयक्रमांशी संलग्‍न असलेल्‍या विद्यार्थ्‍यांना निर्वाह भत्‍ता मंजूर योजनेचे अर्ज भरण्‍यासाठी महाडिबीटी हे पोर्टल दि.14 डिसेंबर,2021 पासूनसुरु करण्‍यात आले आहे. हे अर्ज आता 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत ऑनलाईन दाखल करता येतील.

 विभागातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी शिष्‍यवृत्तीचे अर्ज अचूक भरुन मंजूरीसाठी सहाय्यकआयुक्त, समाजकल्याण, लातूर, उस्मानाबाद, नांदेड तसेच हिंगोली या कार्यालयास 15 फेब्रुवारी, 2022 पर्यत ऑनलाईन सादर करावेत, असे आवाहन येथील समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त यांनी केले आहे. 

ज्या विद्यार्थांनी महाडिबीटीवर यापूर्वी आधार संलग्नीत युजर आयडी तयार करुन अर्ज भरलेले आहेत त्यांनी नवीन नॉनआधार युजर आयडी तयार करु नये. नवीन नॉन आधार युजर आयडी वरुन अर्ज नुतनीकरण केल्यास आणि एकापेक्षा जास्‍त युजर आयडी तयार केल्यास आणि त्यामुळे विदयार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थी व महाविद्यालयांची राहील, असे पत्रकात समाज कल्याण अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. लातूर विभागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. एकही विद्यार्थी या लाभापासून वंचित राहणार नाही, यांची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही प्रादेशिक उपायुक्त अ. र.देवसटवार यांनी केले आहे.    

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी