नांदेड जिल्ह्यात 144 व्यक्ती कोरोना बाधित तर 274 कोरोना बाधित झाले बरे -NNL


नांदेड|
जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 396 अहवालापैकी 274 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 123 तर अँटिजेन तपासणीद्वारे 21 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 1 हजार 639 एवढी झाली असून यातील 96 हजार 689 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. 

आजच्या घडीला 2 हजार 279 रुग्ण उपचार घेत असून यात 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 671 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 61, नायगाव 1, किनवट 9, मुखेड 7, हिंगोली 2, पंजाब 1, नांदेड ग्रामीण 5, उमरी 1, लोहा 6, पुणे 1, परभणी 8, वर्धा 1, धर्माबाद 2, हदगाव 2, माहूर 2, अकोला 1, वाशीम 1, हिमायतनगर 1, कंधार 2, मुदखेड 3, औरंगाबाद 4, हैद्राबाद 2 तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा 2, कंधार 1, उमरखेड 1, भोकर 1, किनवट 5, वाशीम 1, बिलोली 3, नायगाव 4, देगलूर 2, हिंगोली 1 असे एकुण 144 कोरोना बाधित आढळले आहे. 

आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 8, किनवट कोविड रुग्णालय 1, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 85, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 172, खाजगी रुग्णालय 8 असे एकुण 274  कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली.  

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 30, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 1, किनवट कोविड रुग्णालय 2, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 998, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 217,  खाजगी रुग्णालय 30, माहूर कोविड रुग्णालय 1 असे एकुण 2 हजार 279 व्यक्ती उपचार घेत आहेत.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 46 हजार 598

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 28 हजार 931

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 1 हजार 639

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 96 हजार 689

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 671

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.12 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-5

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-141

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-2 हजार 279

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3.  

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. “मिशन कवच कुंडल” अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी