हदगाव, शे.चांदपाशा| सिसीटीव्ही कॅमे-यामुळे हदगाव शहरात चोरी, गुन्हेगारी व दंगलीसारख्या अप्रिय घटनां घडणार नाहीत. आणि शहरात शांतता व सामाजिक सलोखा कायम राहिल, असा विश्वास माजी आमदार मा. नागेश पाटील आष्टीकर यांनी हदगाव येथे शिवसेना संपर्क कार्यालयात आयोजित स्व.हिंदु-हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह पत्रकारांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
हदगाव शहरातील प्रमुख चौकात आ आष्टीकर यांनी पुढाकार घेऊन लोकसहभागातून २६ सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्याचा हदगाव येथे पोलीस प्रशासनाने गणपती विसर्जन शांतता बैठकीत संकल्प केला होता. शहरात कोणीही गैरकृत्य करणार नाही, केले तर त्याच्यावर तात्काळ कारवाई व्हावी या उद्देशाने शहरात सी सी टीव्ही ची गरज आहे. असे मत माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी व्यक्त केले. हिंदू -हृदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांत आष्टीकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमास उपस्थित तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, पत्रकार व हदगाव शहरातील पत्रकार यांच्याशी संवाद साधताना मा.आ.आष्टीकर म्हणाले की, मी आमदार असताना दहा लाख रुपये निधी हदगाव शहरात सिसीटीव्ही कॅमेरे व यंत्रणेसाठी दिले होते. पण वेळत काम झाले नसल्याने तो निधी परत गेला होता. हदगाव येथील शिवसेना संपर्क कार्यालयात शहाजी राजे भोसले, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला माजी आमदार आष्टीकर यांनी पुष्पमाला अर्पन करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला.
त्याचप्रमाणे हदगाव तालुका शिवसेना प्रमुख शामराव चव्हाण, जि.प.सदस्य गजानन गंगासागर, डाॅ.संजय पवार, डाॅ भगवान निळे, बंडू पाटील, हदगाव शहरातील शिवसेनेचे नगरसेवक शिवा चंदेल, बाळा माळोदे, नगरसेविका प्रतिनिधी राहुल भोळे, भोस्करसर, मुधोळकर सर, आदी मान्यवर यांनी प्रतिमांना पुष्प अर्पन करून संयुक्त अभिवादन केले. त्यानंतर हदगाव तालुक्यातील सर्व पत्रकारांचे मा.आ.आष्टीकर व उपस्थित शिवसेना पदाधिकारी यांच्या हस्ते पेन, डायरी, शाला व पुष्पगुच्छ देऊन पत्रकार दिनानिमित्त राहून गेलेल्या सत्कार सोहळा संपन्न करण्यात आला.
स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनाचे, नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती व पत्रकार दिनाचे औचित्यपूर्ण आयोजन करून सर्व पत्रकारांचा भव्य सत्कार सोहळा पार पाडण्यात आला. तत्पूर्वी तालुक्यातील सर्व पत्रकारांना निमंत्रण देवून, फोन व सोशल मिडियाव्दारे संदेश देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार असल्याचे कळविले होते. अत्यंत आनंदाने संपन्न झालेल्या या कार्यक्रमात पत्रकारांच्या वतीने जेष्ठ पत्रकार काॅ. शामप्रसाद लाहोटी यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर हदगाव तालुका शिवसेना प्रमुख शामराव चव्हाण यांनी स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विचार मांडून वाळु तस्करी, चोरी यावर सी सी टीव्हीमुळे आळा बसेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
त्याचबरोबर पंचायत समितीच्या सरकारी भूखंडावर होत असलेल्या अतिक्रमणाबाबत हदगाव येथील पत्रकारांनी तक्रार देवून आवाज उठवल्याबद्दल अभिनंदन केले. त्यानंतर डाॅ संजय पवार यांनी ही स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या बदल बोलताना पत्रकारांचे अभिनंदन केले. अवैध रेती, मटका इत्यादी धंदे बंद करण्याची मागणी करून एका गरिब व्यक्तीने दहा हजार रुपये मटक्यावर लावल्यानंतर एक लाख रूपये मिळतात या लालसेने कसे नुकसान करून घेतले. याबदल प्रतिक्रिया व्यक्त केली. सर्व पत्रकारांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उपस्थितांशी संवाद साधून सविस्तर मार्गदर्शन केले. पत्रकारांची जाहिरातीसाठीची धावपळ, सामाजिक धडपड, सामाजिक बांधिलकी याबद्दल अभिनंदन केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुधोळकर सर यांनी केले तर कार्यक्रमाचे नियोजन कृष्णा पाटील आष्टीकर यांनी केले. यानंतर उपस्थित शिवसेना पदाधिकारी, पत्रकार व पोलीस स्टेशन हदगाव येथे कर्तव्यावर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अप्पासाहेब पवार यांच्या उपस्थित हदगाव शहरातील डाॅ बाबासाहेब आंबेडकर चौक, आझाद चौक आणि पोलीस ठाणे हदगाव येथे सिसीटीव्ही कॅमे-यांचे मा.आ.नागेश पाटील आष्टीकर यांच्या शभहस्ते करून लोकसेवेत सिसीटीव्हीचे लोकार्पन केले.
'तालुक्याचे प्रशासनाचे जबाबदार अधिकारी माञ गैरहजर ...?
तालुक्याचे माजी आ .नागेश पाटील आष्टीकर यांनी गतवर्षी एका प्रशासनाच्या शांतता बैठकीत शहरात सीसीटीव्हि शहरात लावण्याबाबतीत घोषणा केली होती. त्यावेळी प्रशासनाचे वरिष्ठ आधिकारी यांनी माजी आ नागेश पाटील आष्टीकरांचे तोंडभरुन कौतुक केले होते. पण या सीसीटिव्ही लोकर्पणाच्या कार्यक्रमाला एकही अधिकारी उपस्थिती असु नये यावरुन तालुक्याचे प्रशासन किती जागरुक आहे यांची प्रचती आली.