शिवणीहून भोकरकडे जाणाऱ्या दुचाकींचा कार्ला पाटीजवळ अपघात; एकजण जागीच ठार -NNL


हिमायतनगर|
शिवणी येथील काम आटोपून आपल्या गावाकडे जाणाऱ्या दोन तरुणांच्या दुचाकींचा हिमायतनगर तालुक्यातील कार्ला पाटीजवळ अपघात झाला आहे. या दुर्घटनेत एक युवक जागीच ठार झाला सून, दुसऱ्या युवकांवर हिमायतनगर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, भोकर येथील तरुण अजय संजय यशवंतकर आणि आनंद चंदू वाघमारे हे दोघेजण कामानिमित्त शिवणी येथे गेले होते. तेथील काम आटोपून ते सायंकाळी परत दुचाकी क्रमांक एम एच २६ बी आर ०२६५ वरून आपल्या गावी म्हणजे भोकर आकडे निघाले होते. दरम्यान रात्रीला ८ वाजेच्या सुमारास हिमायतनगर तालुक्यातील कार्ला पाटीजवळ येताच एका अज्ञात वाहनाने कट मारल्याने दुचाकींचा अपघात झाला.

या अपघातात दुचाकीचे पुढील चाक निघून पडले असून, त्यामध्ये अजय संजय यशवंतकर वय २४ वर्ष याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर आनंद चंदू वाघमारे वय २८ वर्ष हा गंभीर रित्या जखमी झाला असून, त्याच्यावर हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटना घडल्याचे लक्षात येताच नागरिकांनी तातडीने या दोघांना हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी