हिमायतनगर| येथील शिवसेना शाखेच्या वतीने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित झालेल्या अनेकांनी बाळासाहेबाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची दि.२३ रविवार रोजी ९६ वी जयंती हिमायतनगर येथे साजरी करण्यात आली आहे. या निमित्ताने येथील श्री परमेश्वर मंदिर समोर स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे यांनी प्रथम पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी खा.हेमंतभाऊ पाटील यांचे वतीने जनसंपर्क कार्यालयाकडून वंदनीय बाळासाहेबांची प्रतिमा हिमायतनगर येथील शिवसेना शाखेला जनसंपर्क अधिकारी गोविंद गोडसेलवार यांच्या हस्ते तालुका प्रमुखाकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी उपतालुका प्रमुख विलास वानखेडे, विठ्ठल ठाकरे, शंकर चेलमेलवार, रमेश गुड्डेटवार, रामू नरवाडे, अनिल भोरे, गजानन वानखेडे, अमोल धुमाळे, प्रवीण शिंदे, काईतवाड, ढोणे, व्यंकटी जाधव, दुर्गेश मंडोजवार, फुलके, आदींसह अनेक शिवसैनिक, कार्यकर्ते, मान्यवर अभिवादन करण्याकरिता उपस्थित झाले होते.