मुखेड, रणजित जामखेडकर| मुखेड तालुक्यातील बहुचर्चित उंद्री ( पदे ) सेवा सहकारी सोसायटी सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माधवराव पा.उंद्रिकर यांच्या शेतकरी विकास पॅनलचे १३ पैकी १३ उमेदवार प्रचंड मतांनी निवडून आले आहेत.
काँग्रेस पक्षाचे नेते माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर व माजी जि. प. दिलीप पाटील बेटमोगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माधवराव पा वडजे उंद्रीकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या सेवा सहकारी सोसायटीच्या सार्वत्रिक निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने विजयी झालेले नवनिर्वाचित सेवा सहकारी सोसायटी सदस्य माधवराव पा. वडजे ,हाणमंतराव पा.वडजे, हावगीराव बसापुरे ,प्रकाश पा सुर्यवंशी, शिवाजी.पा उंद्रे, रविंद्र देशाई ,बालाजी पा. भोकरे, यादव सोनकांबळे,रंजित वाघमारे,मारोती शिरगिरे, मिनाक्षीताई नरवाडे,रमेश जळबा पवार,महेबुब शेख यांची प्रचंड मतांनी निवड झाली आहे.
यांच्या निवडीबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री, पालकमंत्री अशोकराव चव्हाण, भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार हणमंतराव पा. बेटमोगरेकर, आ. अमर राजुरकर, माजी मंत्री डी.पी सावंत, माजी जि.प अध्यक्ष श्रिराम पाटील राजुरकर, माजी आमदार अविनाश घाटे, दिलीप पा. बेटमोगरेकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी आंबुलगेकर , काँग्रेस कमीटी तालुका अध्यक्ष भाऊसाहेब पाटील मंडलापुरकर ,राजन देशपांडे, नंदुकुमार मंडगुलवार, उत्तम अण्णा चौधरी, जि.प सदस्य प्र.संतोष बोन्लेंवाड,महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अनिताताई राजुरकर , डॉ रणजित काळे, संदिप घाटे , किरण पा बोडके, आकाश पा. उंद्रिकर , मारोती पा मटके, यांच्या सह जिल्हाभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.