मुखेड, रणजित जामखेडकर| बहुजन वर्गातील तमाम रयतेचे श्रध्दास्थान असलेले कुळुवाडी भुषण छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारलेले आहे हे स्मारक मुखेड शहरात नावलौकीकात व सौंदर्यात भर टाकणारे स्मारक रखडलेले काम सुरू व्हावे अशी तमाम शिवप्रेमी बांधवांची मागणी आहे.
मुखेड शहरात छत्रपती शिवरायांची जयंती दि १९ फेब्रुवारी २०२२ रोजी शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. परंतु मुखेड नगरपरिषद तमाम शिवप्रमीचे स्वप्न धुळीला मिळविण्याचे काम सातत्याने करीत आहे.
यावर्षी शहरात शिवजन्मोत्सव मोठ्या आनंदाने भव्य दिव्य स्वरुपात साजरा केला जाणार आहे.या शिव जन्मोत्सवाचे कार्यक्रम लक्षात घेऊन शिवस्मरकाचे रखडलेले काम त्वरीत पूर्ण करावी अशी विनंती राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे .तेव्हा स्मारकाच्या सुशोभिकरणाचे रखडलेले काम पुढीलप्रमाणे आहे.
१)शिवप्रेमी बांधवांना छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठीची जिन्याची कायम स्वरुपी सोय करावी. २) शिवस्मारकाच्या चोहुबाजुने विशेष म्हणजे पायऱ्यावर रॅलींग उभी करावे संरक्षण भितीस रंग रंगोटी करावे ३) शिवस्मारक परिसरातील पथदिवे लावुन स्वच्छ प्रकाशाची व्यवस्था करावे ४) सी.सी.टिव्ही कॅमेराची चित्रीकरणाची व्यवस्थ करावे,
वरीलप्रमाणे स्मारकाचे रखडलेले कामे तात्काळ करुन शिप्रेमी मावळ्याची इच्छा पूर्ण करावी अशी मागणी मुखेड नगरपरिषदचे मुख्याधिकारी महेश हांडे यांच्याकडे राजमुद्रा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन पा.इंगोले, जिल्हाध्यक्ष शहाजी पा.शिंदे, तालुका अध्यक्ष बालाजी पाटील इंगोले यांच्या सह तालुक्यातील शिवप्रेमी बांधवांनी निवेदनाद्वारे केली आहे.