मुखेड, रणजित जामखेडकर| राज्य शासनाने त्वरित शाळा महाविद्यालय खाजगी शिकवनी शुरू करवीत अशी मागणी मुखेड / कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ तुषार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मुखेड भाजपा शाखेच्या वतीने पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व गटशिक्षण शिक्षण अधिकारी यांच्या मार्फत , स्थानिक जिल्हा प्रशासन व महाविकास आघाडी सरकार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सरसकट शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस बंद करण्याचा घेतलेला तुघलकी निर्णय अत्यंत चुकीचा व तितकाच दुर्दैवी आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर दुरगामी परिणाम होत आहेत. ऑनलाईन शिक्षण हे सर्वसामान्य गोर-गरीब विद्यार्थी व दुर्गम / अतिदुर्गम खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतच नाही. गेल्या दोन वर्षांपासून शाळा,महाविद्यालये बंद असल्याने ग्रामीण व शहरी भागातील शैक्षणिक दरी वाढुन सर्वसामान्य जनतेची मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून कोसो दूर फेकले जात आहेत. यामुळे मुलांचे शिक्षणाचे गांभीर्य नष्ट होत असून त्यांचे नुकसान होत आहे.
राज्यभरात सुमारे एक लाख कोचिंग क्लासेस आहेत यामधुन दहा लाखांपेक्षा जास्त खाजगी शिकवणी घेणारे शिक्षक व प्राध्यापक शिकवतात. यावर अवलंबून असणारे कुटुंब व इतर पन्नास लाख लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. शिवाय विनाअनुदानित व इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षक यांची दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे, त्यांचेवर उपासमारीची नव्हे तर अक्षरशः आत्महत्येची वेळ आली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी अठरा वर्षे वयावरील आहेत,त्यांनी लसीचे दोन्ही मात्रा घेतलेल्या आहेत तर पंधरा वर्षांवरील लसीकरण सुद्धा वेगाने होत आहेत.
केवळ कोरोनाची भिती दाखवून राज्यभरातील शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस बंदचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. शाळा बंदच्या या निर्णयामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. राज्यभरात सर्वच व्यवसाय कोरोना निर्बंधासहीत सुरु आहेत. तेव्हा सरकारने कोरोनाचे नियम लावून शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस सुरू करण्याची परवानगी द्यावी.
सरकारने दिनांक २६ जानेवारी पर्यंत शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस सुरू करण्याचा आदेश द्यावा अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सरकारला देण्यात आला. यावेळी प.स सभापती प्र.लक्ष्मण पा. खैरकेकर, भाजपा तालुकाध्यक्ष डाॅ. विरभद्र हिमागिरे , शहराध्यक्ष किशोरसिंह चौहान, प.स सदस्य राम पाटील चांडोलकर , शहर उपाध्यक्ष राजू रणाभिड़कर , शहर सरचिटनिस महावीर शिवपूजे , बस्वराज चापुले, शहर उपाध्यक्ष संदीप काळे, भाजपा सो मिडिया प्रमुख सुधीर चव्हाण, गणेश जाधव, कल्याण पाटील , सतीश डाकुरवार , गणेश आंबेकर यांच्या सह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यात सर्वच व्यवसाय , दुकाने कोरोना निर्बंधांसह चालु आहेत. राज्यात
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुका / पोटनिवडणुका घेतल्या जातात व निवडीबद्दल विजयी जल्लोष मिरवणुकीत हजारो लोकांचा विनामास्क जमाव चालतो मग शाळा महाविद्यालया मध्येच कोरोनाचा शिरकाव कसा होतो याबाबत राज्य सरकारची व स्थानिक प्रशासनाची भूमिका संशयास्पद आहे. शासनाने तात्काळ शाळा महाविद्यालये चालू करावेत.
भाजपा तालुकाध्यक्ष डॉ.विरभद्र हिमगीरे
कोरोना तिस-या लाटेचा व ओमायक्रॉन नवीन कोरोना विषानुचा प्रभाव वाढत असल्याचा विनाकारण बाऊ दाखवत राज्य शासनाने पुन्हा शाळा, महाविद्यालय व खाजगी शिकवणी वर्ग बंद केली आहेत.एकिकडे इतर सर्व व्यवहार सुरळीत सुरु असताना राज्य शासनाने विद्यार्थ्याच्या भविष्या सोबत बीघाडी सरकारने खेळ - खंडोबा मांडला आहे.