रान डुकराच्या धडकेत हिमायतनगरातील शेतकरी प्रभाकर कदम यांचा मृत्यू -NNL


हिमायतनगर|
तालुक्यातील कोठा येथील रहिवासी शेतकरी प्रभाकर नारायण कदम हे दि.17  च्या रात्री 7.30 च्या सुमारास दुचाकीवर शेतात जात असताना अचानक रानडुकरांचा कळप रस्त्यावर आल्याने धडक होऊन डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.  

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, पैनगंगा नदीकाठावर कोठा तांडा हे गाव आहे, सध्या रब्बीचा हंगाम सुरु आहे, मात्र महावितरण कडून विजेचा पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकर्यां रात्री - अपरात्रीला शेतीकडे जावे लागते आहे.  अश्याच कामानिमित्त शेतीकडे जात असताना रानडुकराराने मयत शेतकऱ्याच्या दुचाकीला जबर धडक दिल्याने हि घटना घडली आहे. 

मौजे कोठा (ज) ता. हिमायतनगर जि. नांदेड येथील शेतकरी प्रभाकर नारायण कदम हे रात्री 7.30 वाजेच्या सुमारास आपल्या दुचाकीवर शेतात जात असताना अचानक रानडुकरांचा कळप रस्त्यावर आला. त्यातील एका रानडुकराने मोटार सायकलिस जबर धडक दिल्यामुळे प्रभाकर नारायण कदम हे मोटार सायकल वरून खाली पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर प्रमाणात मार लागल्या मुळे व खूप रक्तस्त्राव होत होता. तात्काळ त्यांना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेत असतांना रस्त्यातच त्यांची प्राणजोत माववली.


प्रभाकर नारायण कदम हे घरचे करता धरता कुटुंब प्रमुख होते. त्यांच्या जाण्याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलं आहे. त्यांच्या मृत्यू पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. प्रभाकर नारायणराव कदम यांच्या आत्म्याला शांती लाभो व सर्व कदम परिवारास या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो अशी प्रार्थना करत आज त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी १ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले असल्याचे नातेवाईकांनी अरविंद सोळंके यांनी सांगितले. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी