हिमायतनगरच्या मारोती मंदिरात दत्त जन्मोत्सव सोहळा थाटात संपन्न -NNL

ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे अंश म्हणजेच श्री गुरुदेव दत्त - पुरोहित कांतागुरु वाळके  


हिमायतनगर|
ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे स्थान सर्वोच्चपरी आहे. या तिन्ही देवांचे अंश म्हणजेच अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आहेत. असे प्रतिपादन हभप.पुरोहित कांतागुरु वाळके यांनी केले. ते हिमायतनगर येथील पोलीस स्थानक नजीक असलेल्या मारोती मंदिरात दि.१८ डिसेंबर रोजी श्री दत्त जन्मोत्सव निमित्त आयोजित प्रवचनातून बोलत होते.


दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे शनिवार १८ डिसेंबर २०२१ रोजी आलेल्या दत्त जयंती उत्सवाचे आयोजन येथील दक्षिणमुखी मारोती मंदिर कमिटीच्या वतीने करण्यात आले होते. प्रथमतः सकाळी श्री संतोष पळशीकर यांनी सपत्नीक प्रभू दत्तात्रेयाचा अभिषेक महापूजा केली. त्यानंतर भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. लागलीच सकाळी ११ वाजता हभप कांतागुरु वाळके यांच्या प्रवचन आयोजित करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले कि, पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्या आसुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी देवतांनी केलेले प्रयत्न असफल झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार विविध ठिकाणी वेगवेगळया रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले तेंव्हापासून तो दिवस `दत्तजयंती’ म्हणून साजरा करतात.



सत्य हाच धर्म, असत्य हेच कर्म, याशिवाय धर्म आणि अधर्माचे दुसरे वर्म नाही. मुखाने नामाचे स्मरण केले तरच सदगती प्राप्त होईल, नामाला विन्मुख होणं म्हणजेच अधोगती कडे जण होय. संतांची संगत हाच स्वर्गवास, संताकडे पाठ फिरवणं हाच नरकवास होय. काम, क्रोध, लोभ, मत्सर जीवनात आवश्यक आहे, मात्र त्याचा लिमिटेड प्रमाणात उपयोग केला पाहिजे नाहीतर मानवी जीवन अधोगतीकडे गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मनुष्याने आपले "हित कशात आहे आणि घात कशात आहे ते ओळखून उचित तेच करावं असे त्यांनी सांगत ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे स्थान सर्वोच्चपरी आहे. या तिन्ही देवांचे अंश म्हणजेच अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आहे. असे सांगून ब्रम्हा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले... मला हो दत्त गुरु दिसले.... असे म्हणताच १२.३० वाजता भगवान श्री गुरु दत्ताचा जन्मसोहळा मोठ्या उत्सहात पार पडला.



यावेळी उपस्थित महिला मंडळींनी पाळणे म्हणत जन्मोत्सव साजरी केला. त्यानंतर लागलीच पळशीकर दाम्पत्यांनी महाआरती केल्यानंतर महाप्रसादाचे वितरणाच्या उत्सवाची सांगता झाली. यावेळी मंदिर कमिटीचे अध्यक्ष बाळू अण्णा चवरे, उपाध्यक्ष संतोष अप्पा पळशीकर, सचिव शिवअप्पा तुपतेवार, बाबूअप्पा बंडेवार, विठ्ठलराव वानखेडे गुरुजी बाबूराव डांगे, बाळू साखरकर, लक्ष्मीबाई गड्डमवार, जन्नावार बाई, पळशीकर मैडम, बंडेवार, पोपलवार, कोमावार, राठोड, मेरगेवाड, यंगलवार, पार्डीकर, मादसवार, डॉ.आनंद माने, शंकर पाटील, पोलिस निरीक्षक भगवान कांबळे, मिलिंद जन्नावार, सुधाकर चव्हाण, धर्मपुरी गुंडेवार, नारायणराव कात्रे, खंडू चव्हाण, गुंडेवार, बनसोडे, ठाकूर, फुलके, मुत्तलवाड, जुन्नावार, आदींसह महिला पुरुष भजनी मंडळ, गुरुदेव सेवा मंडळाचे सदस्य आणि महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी