रेतीसह अन्य गौण खनिज तस्करीने हिमायतनगरात शासनाच्या महसुलाला लाखोचा चुना... NNL

वाळूदादांसह अधिकारी - कर्मचारी मालामाल


हिमायतनगर,अनिल मादसवार|
विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीच्या हिमायतनगर- उमरखेड भागातील अनेक रेती घाटावरून रेतीसह, दगड व मुरूम गौण खनिज तस्करी वाढली असून, तहसील प्रशासन मात्र अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याने शासनाच्या लाखो रुपयाच्या महसुलाला चुना लावला जात आहे. या प्रकारामुळे पैनगंगा नदीचे अस्तित्व धोक्यात आले असून, अधिकारी - कर्मचारी आणि वाळू दादांच मालामाल होत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी नागरिक व उन्हाळ्यात दरवर्षी पाणी टंचाईने त्रस्त होणारे शेतकरी व सर्व सामान्य नागरीकातून केला जात आहे.

हिमायतनगर तालुक्यात सुरु असलेल्या घरकुल बांधकाम, सिमेंट रस्ते, शौचालय यासह विवीध विकास कामे मोठ्या प्रमाणात चालू आहेत. यासाठी लागणारा मुरूम, दगड, रेती आदी बांधकाम साहित्य मिळण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून लिलाव होत नसल्याने गौण खनिजाची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गौण खनिजासाठी आवश्यक असलेली रोयल्टी व वाहतूक परवाना काढण्याची तसदी बांधकाम व्यावसायिक घेत नसल्याने तहसील प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचार्याकडून गौण खनिज तस्करांना अभय मिळत आहे. यामुळे शासनाचा महसूल शासनाचेच कर्मचारी बुडविण्यास कारणीभूत ठरत आहेत. 


तालुक्यात अनेक ठिकाणच्या रेती पेंडाचा (धक्क्याचा) जाहीर लिलाव झाला नसताना बिन बोभाट हजारो ब्रास रेतीचा उपसा केला जात आहे. परिणामी पर्यावरणाचा ऱ्हास होत असून, शासनाचा वसूल होणार महसुल बुडविला जात आहे. रेती तस्करांशी महसूल विभागाचे असलेले हितसंबंध कार्यवाहीस आड येत आहेत कि काय..? असा सवाल पर्यावरण प्रेमी नागरीकातून विचारला जात आहे. शासनाचे नियुक्त केलेले अधिकारी शासन दरबारी महसूल जमा करण्याऐवजी स्वतःच्या स्वार्थापोटी वसूल करण्यात धन्यात मानत असल्याने सरकारी तोजोरीवर दरोडा टाकण्यात अधिकारी व कर्मचारी यशस्वी होत असल्याचे चित्र तालुक्यात चालू असलेल्या गौण खनिज तस्कारीवरून दिसून येत आहे. 

संबंधित सज्जा अंतर्गत येणाऱ्या गौण खनिज धक्क्याकडे सबंधित तलाठी, मंडळ अधिकारी व महसुलाचे नायब ताहिलदार याना विचारपूस करणाऱ्या नागरिकांना रोयल्टी देण्यात आली असल्याचे सांगून दिशाभूल केली जाते. परंतु आजघडीला कुठलाही लिलाव झाला नसला तरी वाळूदादा आमच्याकडे परवानगी आहे असे सांगून सर्रास दिवस रात्र आणि गौण खनिज उत्खननाच्या नियमांची पायमल्ली करून वाळू, मुरूम यासह अन्य गौण खनिज उपसा करून आपले उखळ पांढरे करत आहेत. या प्रकाराकडे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी हिमायतनगर भागात चालू असलेल्या चोर चोर मौसेरे भाई.. या कारभाराची चौकशी केल्यास तहसील कार्यालयातील जबाबदार अधिकार्यासह, रेती तस्करांशी साटेलोटे करणाऱ्या तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांचे बिंग फुटेल अशी प्रतिक्रिया पर्यावरण प्रेमी व पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या नागरीकातून पुढे येत आहे. 

तालुक्यातील धानोरा, कामारी, घारापुर, रेणापूर, एकंबा, कौठा, वारंगटाकळी, धानोरा, सिरपल्ली, कौठा तांडा, वारंगटाकळी, रेणापूर, आंदेगाव, खडकी, पार्डी, सरसम, टेंभी मासोबा नाला तसेच नदी, नाल्याच्या काठावरील रेती पेंडावरून तहसील कार्यालयाच्या अधिकारी कर्मचाऱ्याच्या मूक संमतीने राजकीय वरदहस्त असलेल्या काही वाळूदादा रेतीसह, विविध गौण खनिज काढून शासन व जनतेचं डोळ्या धूळफेक करीत आहेत. गौण खनिज उत्खननाच्या सर्वच नियमन बगल देत रात्री - अपरात्रीला रेतीचा उपसा करून शहर व ग्रामीण भागात सकाळच्या रामप्रहरी रेतीची वाहतूक करून अव्वाच्या - सव्वा दराने विक्री करत आहेत. आम्हाला मिळालेल्या माहितीवरून आम्ही अथवा आमच्या कुण्याही कर्मचाऱ्यांना पाठवीलो असता वाहने अगोदरच पसार झाल्याचे दिसते अशी माहिती महसूल विभागात कार्यरत असलेल्या एका अधिकार्याने कुणालाही नाव न सांगण्याचा अटीवर नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली आहे.       

मागील ४ वर्षपूर्वी पैनगंगा नदीपात्रामध्ये पाण्यासाठी ९० गावच्या शेतकरी, नागरिकांचे बेमुदत धरणे आंदोलन केले होते. यावेळी भेटी दिलेल्या अनेक आजी - माजी नेत्यांनी पाणी टंचाईला कारणीभूत असलेल्या रेतीचा उपसा आणि झालेली आणि होत असलेली रेती तस्करी असल्याचे सांगून नदीकाठावरील गावकर्यांनी प्रथमतः नदीतून होणाऱ्या रेतीच्या उत्खनन करणाऱ्यांवर अंकुश लावून रेतीउपसा बंद करा असे सुचविले होते. नेत्यांचा आश्वासनाला नदीपात्रातील आंदोलकांनी यापुढे रेतीचे उत्खनन होऊ देणार नसल्याची शपथ घेतली. मात्र तहसीलचे अधिकारी - कर्मचारी यांच्या आशीर्वादाने रेतीची चोरी सुरूच आहे. त्यामुळे नांदेड व यवतमाळच्या जिल्हाधिकारी महोदयांनी नदीपात्राची रेतीच्या उत्खननाच्या बाबतीत कडक निर्देश देऊन रेतीचोरीवर आळा घालण्याकडे लक्ष देऊन हिमायतनगर - उमरखेड तालुक्यातील पर्यावरणाला निर्माण होणार धोका टाळावा अशी रास्त अपेक्षा व्यक्त होत आहे. 

या बाबत तहसीलदार डी.एन. गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, अवैद्य रेती तस्करीवर आळा घालण्यासाठी आम्ही तीन पथके नेमली आहेत. प्रत्येकाला एक एक सर्कल देण्यात आले आहेत, सध्यातरी रेतीसह अन्य उत्खनन बंद आहे असे त्यांनी सांगितले आहे.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी