अतिवृष्टीचे दुष्काळी अनुदान गाव निहाय वाटप होणार - एनडीसीचे शाखाधिकारी श्री वाडेकर -NNL


हिमायतनग|
नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेत यंदा खरिपात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानी पोटी शेतकऱ्यांचे दुष्काळ अनुदान बैंकेत जमा झाले आहे. सदरील अनुदान गाव निहाय वाटप करण्यात येणार असल्याची माहिती शाखा अधिकारी पि.व्हि.वाडेकर यांनी दिली आहे.

हिमायतनगर येथील नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेत दुष्काळ अनुदान वाटप करताना शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी होत असल्याने सदरील शेतकऱ्यांचे अनुदान हे गाव निहाय वाटप करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहे. त्यानुसार गाव निहाय वाटप करण्यात येणार असल्याची माहिती शाखा अधिकारी पि. व्हि. वाडेकर यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली आहे.

ज्या तारखेला गावचा क्रम लागेल त्याच दिवशी शेतकऱ्यांनी बँकेत यावे असे आवाहन शाखा अधिकारी वाडेकर यांनी केले आहे. गाव निहाय दुधड 23 ते 24 डिसेंबर, दरेसरसम 27 ते 29 डिसेंबर, एकघरी 30 डिसेंबर रोजी, घारापुर 31 डिसेंबर, एकंबा 1 जानेवारी ते 3 जानेवारी , हिमायतनगर 4 ते 7 जानेवारी, जिरोना 10 ते 11 जानेवारी, कारला 12 ते 14 जानेवारी अशा प्रकारे गाव निहाय अनुदान वाटप होणार असून, शेतकऱ्यांनी गाव लागेल त्याच तारखेला बँकेत अनुदान उचलण्याकरीता उपस्थित होऊन बैंक प्रश्नाला सहकार्य करावे जेणे करून शेतकऱ्यांचं अडचण होणार नाही आणि अनुदान वाटप सुरळीत होईल  असे अवाहन त्यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी