लसीकरण नसल्यास होणार दंडात्मक कार्यवाही; टेंभुर्णी ग्रामपंचायतीचा उपक्रम -NNL

गावात येणाऱ्या अनेक व्यावसायिकांनी घेतली लस  


हिमायतनगर|
टेंभुर्णी येथील सरपंच, ग्रामसेवक व सदस्यांनी शासनाच्या लसीकरणाच्या उद्देशाला पूर्ण करण्याचा विडा उचलला आहे. आजपर्यंत गावात १०० टक्के पहिला डॉस अणि 75% दुसरा डोस असे लसीकरण झाले आहे. आता गावात येणाऱ्या प्रत्येकानी लास घेतली असेल तर प[रवानगी नाहीतर नो एंट्री असे फलक लावल्यामुळे टेंभुर्णी गावची चर्चा तालुक्यात होते आहे. याचा परिणाम असा झाला कि, गावात येणार फेरीवाला व इतर व्यवसायिक ज्यांनी लस घेतली नाही ते लसीकरण करून घेत आहेत. अशी माहिती येथील माजी सरपंच प्रल्हाद पाटील टेम्भूर्णीकर यांनी दिली.

जानेवारी 2021 मध्ये covid च्या लसीकरणाला सुरवात झाली. पण ही लस तालुक्याच्या ठिकाणी जाऊन घ्यावी लागत होती. त्यामध्ये सुद्धा नियम होते की बीपी, शुगर, 60 वर्षावरील वरीष्ठ नागरिक, फ्रंट वर्कर्स, आरोग्य कर्मचारी, शिक्षक, यांच्यासाठी लसीकरण दिले जात होते. नंतर फेब्रुवारी-मार्च 2021 मध्ये covid चि दुसरी लाट मोठ्या प्रमाणात सुरू झाली. आणि सबंध राज्य भर आणि देशात हाहाकार उडाला गावेच्या गावे या विळख्यात सापडले. नंतर सरकारने 18 वर्षावरील आणि सर्वच वयोगटातील नागरिकांना लस उपलब्ध करून दिली.

काही काळानंतर नंतर दुसरी लाट हळुहळु ओसरला लागली. ज्यांना covid चि लागण झाली किंवा covid मुळ ज्यांच्या घरातील जिव गेला त्यानाच covid समजाला. अणि जे covid मधून बरे झाले किंवा ज्यांना covid झालाच नाही ती जनता- सरकार, आमदार, खासदार, डॉक्टर, दवाखाने, गावाचे सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी, आरोग्य कर्मचारी, या सर्वांना दोषी ठरवू लागले. याच काळात सरकारने लसीकरनावर भर दिला व गावोगावी जाऊन लसीकरण केले जाऊ लागले. तरी ग्रामीण भागात मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांनी सरपंच यशोदाबाई पाटील, माजी सरपंच प्रल्हाद पाटील व उपसरपंच लक्ष्मीबाई जाधव, ग्रामसेवक अनिल कदम, लहाने सर, बांगर सर, आशा अणि अंगणवाडी ताई यांना ही माहिती दिली. त्यावेळी सरपंच यशोदाबाई पाटील यांनी जातीने लक्ष घालून गावातील नागरिकांशी चर्चा सुरू केली.


सोबत ग्रामसेवक अनिल कदम, शाळेचे मुख्याध्यापक लहाने सर,पावन मारी शाळेचे मुख्याध्यापक बांगर सर, पावनमारी चे पोलिस पाटील किसानराव जाधव, शिवाजी जाधव, अंगणवाडी, आशा वर्कर्स, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बापुराव पाटील, स्वच्छता समितीचे अध्यक्ष प्रभाकरराव पाटील या सर्वांच्या मदतीने घरोघरी जाऊन 18 वर्षावरील तरुण, जेष्ठ नागरिक, महिला, स्थलांतरित, कामासाठी बाहेर गेलेले ही सर्व माहिती उपलब्ध करून घेतली. आणि गावातील नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व पटून सांगितले. जुन्या काळात पंढरपूरला जातांना कॉलरा या रोगाची लस घेवून जावे लागत गेले.

तसेच गरीब कुटुंब, काम करून उदरनिर्वाह करणारे लोक, शेतकरी, शेतात पिकले तरच जवळ पैसे येणार मग रोगाची लागण झाली तर लाखो रुपये कुठून आणणार..? आशी अनेक प्रश्न त्यांना विचारले , त्यांच्या अडचणी समजून घेत त्यांच म्हणे  ऐकून घेतले. मला काही झाल तर जबाबदारी घेता का..? कोणत्याच गावत लस घ्या म्हणुन सांगत नाहीत. तुम्हीच कस काय घ्या म्हनता..? आपल्या गावत काय नियम वेगळा आणि दुसर्‍या गावत वेगळा कसा..? असे प्रश्न सांगू लागले. त्यातच ग्रामसेवक अनिल कदम यांचीही बादली झाली आणि त्यांचे जागी आनंद कदम ग्रामसेवक म्हणुन रुजू झाले.

गावाला दिलेले उद्दिष्ट होते टेंभुर्णी साठी 507 आणि गावात लाभार्थी होते 492 पावणमारी साठी उद्दिष्ट होते 121 आणि लाभार्थी होते 101 ही बाब सरपंच यशोदा पाटील यांनी ग्रामसेवक आनंद कदम यांना समजावली. मग ग्रामसेवक यांनी गटविकास अधिकारी यांना लेखी पत्राद्वारे कळविले आणि एक दिवस आड लसीकरण सुरू केले. बाहेर गावी असलेल्या नागरिकांना त्या ठिकाणी लस घेण्यास सांगितले तसेच ऊसतोड करायला गेलेले मजूर, वीट काम करायला गेलेले मजूर, गावातील सरकारी सेवेत असलेले कर्मचारी, अधिकारी यांच्याशी संपर्क साधला त्यांना लस घेण्यास विनंती केली त्यांनी लस घेतलेला पुरावा मागुन घेतला.

आशा पद्धतीने गावात आज 100% पहिला डोस अणि 75% दुसरा डोस असे लसीकरण झाले आहे. तसेच या संदर्भातला सगळा आढावा घेऊन गावातील नागरिकांना नवीन varient omicron बद्द्ल माहिती दिली. आणि आपला गाव परत तिसर्‍या लाटेकडे जाऊ नये यासाठी लस घेणे आवश्यक आहे असे समजवले. १००% लसीकरण राबवण्यासाठी उपआरोग्य केंद्र विरसणी येथील CHO भालेराव मॅडम, MPW तुकाराम पौरे , सिस्टर काळे मॅडम, ग्रामसेवक आनंद कदम,  बापूराव माने, प्रभाकर माने, सुरेश देवसरकर, स्वस्त धान्य दुकानदार सुरेश पाटील, उपसरपंच लक्ष्मीबाई जाधव, शिवाजी जाधव, किशनराव जाधव, विनायक माने, बाबुराव माने, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विकास देवसरकर, ग्रामपंचायत सेवक किशोर कांबळे, अंगणवाडी अशा वर्कर्स अणि गावातील सर्व तरुण मंडळी, प्रतिष्ठित नागरिक अणि महिला मंडळी या सर्वांनी मोलाचे सहकार्य केले त्यामुळे गावात लसीकरणाचे महत्व पटले आहे.

आता गावात पुन्हा कोरोनाचा शीरकावं होणार नाही यासाठी आता गावात येणाऱ्या प्रत्येक फेरीवाल्यास सर्वांचा कोरोना लास घेलती असले तर येण्याची परवानगी अन्यथा नाही असे फलक, बैनर लावण्यात आले आहे. गावकऱ्यांच्या या जागरूकतेमुळे व्यवसाय करण्यासाठी येणारे लोकही जागरूक झाले असून, आजपर्यंत गावात येणाऱ्या प्रत्येक जन गावात लास घेऊन येत असल्याचे सांगण्यात आले आहे. आत एक एक करत हिमायतनगर तालुक्यातील गावाच्या सरपंच, ग्रामसेवक आणि इतरांनी टेंभुर्णी गावचा आदर्श घेऊन लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा प्रलकहद पाटील टेम्भूर्णीकर यांनी व्यक्त केली आहे.   

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी