जवळ्यातील दिव्यांगास मिळाले जयपूर फूट -NNL


नांदेड|
साधू वासवानी मिशन पुणे, प्रेमकुमार फेरवाणी मित्र मंडळ, लाॅयन्स क्लब नांदेड मिडटाऊन, पूज्य सिंधी पंचायत नांदेड व विश्व सिंधी सेवा संगम यांच्या संयुक्त विद्यमाने कृत्रिम हात पाय (जयपूर फूट) मोफत शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा फायदा घेऊन सहशिक्षक संतोष घटकार यांच्या पुढाकारातून जवळा येथील केशव रामा गच्चे यांना कृत्रिम पाय बसवून देण्यात आला. या निमित्ताने परिसरातील गरजू दिव्यांगाने नियमित होणाऱ्या शिबिरात सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन मुख्याध्यापक ढवळे जी. एस. यांनी केले. 

अपंगत्व हे आजार – शारीरिक दोष – अपंगत्व – पंगुत्व अशा टप्प्यांतून जात असते. वातावरणातील घटक व आरोग्यदायी परिस्थिती यांच्यामधील विसंवादामुळे एखाद्या व्यक्तीला इतर सामान्य व्यक्तींसारखे वागता येणारे बंधन किंवा कौशल्य विकसित नसते. शारीरिक व्यंग किंवा कार्यक्षमतेतील बदल यांना दिव्यांग असण्याच्या संबंधाने गणले जाते. शालेय जीवनात अनेक विद्यार्थी अशा समस्यांनी ग्रस्त असतात. 

त्यांच्यातील शारीरिक तथा मानसिकदृष्ट्या सक्षम नसण्याचा शोध घेत असहाय्यतेवर मात करण्यासाठी प्रयत्न करणे अथवा काही उपाययोजना करणे यासाठी जवळा दे.च्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिव्यांग सप्ताहानिमित्त 'दिव्यांग मित्र' अभियान राबविण्यात आले. या संदर्भात शालेय मुलांसाठी राज्य पातळीवरुन सुरू असलेल्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकारच्या उपक्रमातील सुविधा उपलब्ध करून देणे, माहिती देणे तसेच गावातील दिव्यांग व्यक्तींसाठी आवश्यकतेनुसार सुविधा उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यासाठी दिव्यांग मित्र सहशिक्षक संतोष घटकार यांना मुख्याध्यापक ढवळे जी., विषय शिक्षक संतोष अंबुलगेकर सहकार्य केले. 

दिव्यांग सप्ताहा निमित्त आयोजित दिव्यांगमित्र अभियानाच्या समारोप प्रसंगी इयत्ता सातवीतील विद्यार्थींनी साक्षी गोडबोले, शुभांगी गोडबोले आणि मुस्कान पठाण यांनी दिव्यांग शिक्षक व केशव गच्चे यांचा पुष्पहार देऊन सत्कार केला. यावेळी गंगाधर ढवळे,  संतोष अंबुलगेकर, हैदर शेख, मारोती चक्रधर, आनंद गोडबोले, शादूल शेख आदी उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी