हिमायतनगरातील नागरिकांनी संशयीय व्यक्ती दिसल्यास पोलिसांना संपर्क करावा -NNL

जनतेने सहकार्य केल्यास घटनांना आवर घालणे शक्य होईल - पोलीस निरीक्षक भगवान कांबळे  


हिमायतनगर|
शहरात गेल्या काही महिन्यापासून लहान- मोठ्या चोरीच्या घटना घडत आहेत, या घटनांच्या मागील चोरटे कोण..? हे अद्याप पुढे आले नसले तरी चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी रात्रगस्त सुरु केल्यामुळे, गेल्या आठ दिवसापासून चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्याना पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने सळो कि पळो करून सोडले आहे. पोलिसांचा सुगावा लागतच चोरटे पळून जाण्यात यशस्वी होत आहेत. हि बाब लक्षात घेता नागरिकांनी देखील पोलिसांना गुप्त माहिती देऊन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सहकार्य करणे आवश्यक आहे. रात्री-अपरात्रीला कुठेहि कुणी संशयित व्यक्ती अथवा टोळके दिसल्यास नागरिकांनी पोलिसाना संपर्क करून माहिती द्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांनी केले आहे.

‘सदरक्षणाय, खलनिग्रहणाय...’ असे ब्रीद पोलिसांच्या खाकी वर्दीवर लावलेले आहे. याचा अर्थ सामान्य जनतेला सुरक्षित ठेऊन ‘खल’ वृत्तीने वागणाऱ्यांना ठेचण्याचे काम पोलिसांनी करणे अपेक्षित आहे. त्यानुसार काम करताना खरी माहिती मिळत नसल्यामुळे तपास  करताना अनेक अडचणींचा सामना पोलिसाना करावा लागतो आहे. मागील काही महिन्यापासून सुरु असलेल्या साखळी पद्धतीने चोरीच्या घटना पाहता, अज्ञात चोरांनी उच्छाद मांडला आहे. तर काही गावात आपसात वाद निर्माण होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन किरकोळ घटना घडत आहेत. हिमायतनगर तालुक्याच्या लोकसंख्येच्या मानाने पोलीस ठाण्याला स्टाफ कमी आहे. असे असताना देखील आमचे पोलीस अधिकारी-कर्मचारी डोळ्यात तेल घालून रात्रगस्त करत आहेत. नागरिकांनी देखील बाहेर गावी जाताना आपल्या घरातील मौल्यवान वस्तू घरात न ठेवता बैंकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेऊन जावे, आणि शेजार्यांना आपण गावी जात असल्याची माहिती देऊन लक्ष ठेवण्याचे सुचवावे. तसेच ज्या त्या परिसरातील काही जागरूक लोकानी रात्रीला शक्य झाल्यास सतर्क राहून टप्प्याटप्प्याने लक्ष ठेवल्यास चोरीच्या घटनांना आळा बसेल. 

पोलीस गस्त घालत असले तरी नागरिकांनी सुद्धा जागृत राहून हिमायतनगर पोलीस ठाणे हद्दीत चोरी, हाणामारी, खून, दरोडे अश्या घटना होऊ नयेत म्हणून आपल्या आजूबाजूला काय घडते. दिवसभर परिसरात कोण संशयित फिरतोय काय...? याकडे लक्ष ठेऊन पोलिसांना गुप्त माहिती देणे आवश्यक आहे. दोन दिवसापूर्वी अशीच घटना रात्रीला संत मेरी माता इमारत परिसरात एका लैबवर घडली. तात्काळ त्यांनी पोलिसांना संपर्क करून माहिती दिल्याने पोलीस लागलीच पोचले, परंत्तू लोकेशन चुकीचे असंल्याने चोरट्याना पोलीस आल्याचा सुगावा लागला आणि त्यांनी पळ काढला. मात्र  पोलीस वेळेवर पोचल्याने एका व्यक्तीच्या जीवावर बेतणारी घटना टळली. अश्या घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी नागरिकांनी संशयित अथवा अज्ञात व्यक्ती दिसल्यास आजूबाजूला कुठं काही घटना घडत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ पोलिसांना संपर्क साधावा. 

यासाठी हिमायतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांचे मोबाईल क्रमांक - 8691880033 , सहाय्यक पोलीस निरीक्षक,बालाजी महाजन यांचे मोबाईल क्रमांक - 9689707038 , सहाय्यक पोलीस निरीक्षक एन. एन.चौधरी यांचे मोबाईल क्रमांक - 9764123018 , महिला पोलिस उपनिरीक्षक एस डी जाधव यांचे मोबाईल क्रमांक - 9403220648 , पोलीस जमादार अशोक सिंगणवाड यांचे मोबाईल क्रमांक - 9049075521 , हेमंत चोल यांचे मोबाईल क्रमांक - 9765887150  वर संपर्क साधून सहकार्य करावे. यामुळे वेळेवर पोलीस घटनास्थळावर पोचतील आणि चोरीसह इतर घटनां टाळून आरोपीना जेरबंद करणे सहज शक्य होईल.


 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी