नांदेड| नांदेड शांघाय ( चीन ) येथे २०२२ मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेच्या फेऱ्यांमध्ये शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथील पेंटर ट्रेडचा प्रशिक्षणार्थी गणेश भावे याने राज्यस्तरीय स्पर्धेत रजत पदक प्राप्त केले आहे.
नुकत्याच मुंबई येथे महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचा रितसर बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला . माननीय नवाब मलिक कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक मा.दळवी व प्रमुख , स्मृतिचिन्ह रोखबक्षीस हस्ते गणेश भावेस रजतपदक प्रदान करण्यात आहे महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या वतीने घेण्यात आलेल्या निवड चाचणी पात्रता फेरी जिल्हा विभाग राज्य घेण्यात आल्या असुन यात प्रथम फेरीत राज्यातील २० हजार ९० उमदेवारांनी नोंदणी केली होती.
विभागीय स्पर्धेसाठी यातुन ६५४ उमेदवारांची ४७ विविध कौशल्य स्पर्धेसाठी निवड करण्यात आली . राजस्तरीय पात्रता फेरीत औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथील पेंटर ट्रेडचा प्रशिक्षणार्थी गणेश भावे याने पेंटिंग अॅण्ड डेकोरेटींग या कौशल प्रकारात स्पर्धेत सहभागी होऊन रजत पदक प्राप्त केले आहे . यापूर्वी गणेश भावे याने अनेक स्पर्धेमध्ये यश संपादन केले आहे . शालेय व महाविद्यालयीन जीवनापासुन चित्रकलेची आवड असल्यामुळे या क्षेत्रात यश संपादन करण्यात मदत झाली .
राजस्तरीय पात्रता फेरीत यश संपादन करण्यासाठी त्यास निदेशक दिलीप पुंडगे, प्रकाश बानाटे, संजीवनी जाधव यांचे मौलीक मार्गदर्शन लाभले.व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय विभागीय औरंगाबाद चे सहसंचालक एस आर सूर्यवंशी,जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी बिरादार एम.एस,शासकीय आय.टी.आय नांदेड चे प्राचार्य सुभाष परघणे,प्रबंधक राठोड सर्व गटनिदेशक सौ.कविता दासवाड,बरगे एस . के,विकास भोसीकर,रवींद्र वानखेड़े,सोसायटी अध्यक्ष संजय अन्नेवार निदेशक संघटनेचे अध्यक्ष सोलेवाड स्टॉफ क्लबचे राका सचिन,एन एस एस अधिकारी कलंबरकर,सर्व अधिकारी,शिल्पनिदेशक कार्यालयीन कर्मचारी चर्तुथा श्रेणी कर्मचारी यांनी गणेश भावेचे अभिनंदन केले.