ग्रामस्थांनी मानले इंजि दाडगे यांची जाहीर आभार
लोहा| चाळीस वर्षे रस्त्यासाठी संघर्ष.. पावसाळ्यात तर..मरण यातना..शिवाय नदीला पूर आला तर झाले..आल्याड..पण पल्याड..जाणे बंद...असा दुरावस्थेत जगणाऱ्या लोहा तालुक्यातील धानोरा मक्ता अंतर्गत गांधी नगर येथील ग्रामस्थांच्या लढ्याला यश आले..आणि लोहा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता वैजनाथ दाडगे यांनी ग्रामीण मार्ग विकास योजनेत या गावच्या रस्त्यांचा समावेश व्हावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आणि शासनाने त्याला मान्यता दिली.अख्ख्या गावाने अभियंता दाडगे यांचे जाहीर अभिनंदन केले.
एरवी एखाद्या अधिकाऱ्यांची तक्रार करणाऱ्या घटना नित्याने घडत असतानाच इंजि.दाडगे यांच्या सारखे लोकोपयोगी काम करणारे अधिकारी असतात याचा पुरता अनुभव लोहा तालुक्याला आला आहे. रस्त्यासाठी नेहमीच नागरिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इंजिनिअर , अधिकारी यांच्या तक्रारी करीत असतात. पण चांगले काम करणारे अभियंता असतात आणि त्यांच्या कामाची दखल निश्चितच घेतली जाते. तालुक्यातील धानोरा मक्ता या ग्रामपंचायत गांधी नगर ही नवीन वस्ती ३५ वर्षापूर्वी वसली आहे. या दोन गावात नदी आहे.शिवाय गांधी नगरला जायला रस्ता नाही
नागरिकांना दररोज सुमारे तीन किलोमीटर पायपीट करावी लागते.पावसाळ्यात नदीला पाणी त्यामुळे संपर्क तुटलेले नदीला जेव्हा पूर येतो तेव्हा गावातील महिलांच्या डोळ्यात पूर आणि मनात हुरहुर असते . इकडचे इकडे-तिकडचे तिकडे अशी स्थिती शाळेला वाट नसल्याने वाट " लागलेली .गरोदर माता व जेष्ठ नागरिकांना वेळेत आरोग्य सेवा मिळत नाही. आणि अनेकांदा दुर्दैवी प्रसंग ओढवतो.
या गावातील ग्रामस्थांनी नदी पात्रात आंदोलन केले. तहसील कार्यालया समोर आमरण उपोषण केले प्रत्येक वेळी आश्वासन मिळाले. सुभाष नगरच्या बांधवांना पाण्यातून जाऊन दफन विधी करावा लागला.असा अनेक त्रासदायक प्रसंग असा या मरण यातना सहन करणाऱ्या काळात लोह्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता वैजनाथ दाडगे यांनी धानोरा नदीवर पूल व गांधीनगर चा तीन किलोमीटर रोड साठीं स्वतः पाठपुरावा केला आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आले.धानोरा मक्ता-गांधीनगर वस्तीत जाणाऱ्या रोडला ग्रामीण मार्ग रस्ते विकास योजना अतंर्गत ग्रामीण मार्ग १५० अशी मान्यता मिळाली आहे. हे कळताच इंजि. दाडगे यांचे सोशल मीडियात अनेकांनी जाहीर अभिनंदन करताना त्यांना पत्र लिहिले.
संभाजी नागरगोजे असा जागरूक नागरिक व कार्यकर्ते यांनी इंजि दाडगे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला . असे सहसा घडत नसते.अधिकऱ्यांच्या नावे नेहमीच ओरड . तक्रार होते पण चांगले काम करणाऱ्या दाडगे तसेच प्रभारी उपविभागीय अभियंता जोशी यांच्या कामाची गावकऱ्यांनी दखल घेतली .जे काम ३५वर्षात झाले नाही ते इंजि दाडगे यांच्या पाठपुराव्याने मार्गी लागले.,लोह्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात आता पर्यंतचे हे सर्वात महत्वाचे काम ठरले आहे.