नांदेड| दसरा सणा निमित्त होणाऱ्या प्रवाश्यांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड रेल्वे विभागातील प्रवाश्यांकारिता पूर्णा ते तिरुपती दरम्यान दिन विशेष गाड्या चालविण्याचे ठरविले आहे. असे पात्र प्रसिद्धीसाठी रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने जारी केले आहे. ते पुढील प्रमाणे:
१.गाडी संख्या 07607 पूर्णा ते तिरुपती दसरा विशेष गाडी : (सोमवार): हि विशेष गाडी पूर्णा येथून दिनांक 11, 18 आणि 25 ऑक्टोबर, 20121 रोजी दुपारी 13.00 वाजता सुटेल आणि नांदेड, मुदखेड, निझामाबाद, सिकंदराबाद, विजयवाडा मार्गे तिरुपती येथे मंगळवारी सकाळी 08.00 वाजता पोहोचेल.
२.गाडी संख्या 07608 तिरुपती ते पूर्णा दसरा विशेष गाडी : (मंगळवार): हि विशेष गाडी तिरुपती येथून दिनांक 12, 19 आणि 26 ऑक्टोबर, 20121 रोजी रात्री 20.15 वाजता सुटेल आणि विजयवाडा, सिकंदराबाद, निझामाबाद, मुदखेड, नांदेड मार्गे पूर्णा येथे बुधवारी दुपारी 15.25 वाजता पोहोचेल.
३. या गाडीत 18 डब्बे असतील. यात 02 एस.एल.आर, 04 जनरल, 09 द्वितीय शय्या, 01 वातानुकूलीत तृतीय श्रेणी, 02 वातानुकुलीत द्वितीय श्रेणी चे डब्बे असतील.