हिमायतनगर| शहरातील परमेश्वर गल्लीतील वॉर्ड क्रमांक १२ मध्ये असलेल्या नवनिर्माण महिला दुर्गा मंडळाच्या वतीने दि.१२ मंगळवारी रक्तदान शिबीर संपन्न झाले.
या शिबिराचे उदघाटन मातेच्या मूर्तीचे पूजन व पुष्पहार अर्पण करून विठ्ठलभाऊ ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नांदेडच्या गुरुगोविंदसिह रक्तपेढीच्या डॉक्टरांनी रक्तसंकलनाचे काम केले. या शिबिरात सायंकाळपर्यंत एकूण ३९ महिला- व युवकांनी रक्तदान करून सामाजिक कार्यात सहभाग घेतला. यावेळी गजानन चायला अनिल मादसवार, परमेश्वर काळे, सदा काळे, बाळू डांगे, आदींसह दुर्गा मंडळ अध्यक्षा रूक्मीनबाई माधराव काळे, उपअध्यक्ष सुप्रिया बबलू काळे आदींसह रक्तदान करणाऱ्या महिला मंडळी व युवकांची उपस्थिती होती.