किनवट, माधव सूर्यवंशी| गोकुंदा शहरातील पेटकुले नगर भागात दोन संशयित इसम चोरी करण्याच्या उदेशाने एका घराच्या आडोशाला ओल सावलीत दबा धरून बसल्याचे गस्तीवर असलेल्या पोलीसांना पाहून पळून जात असताना पोलिसानी गल्लीतील लोकांच्या मदतीने १२ ऑक्टोबर रोजी रात्री फिल्मी स्टाईल ने पकडले ते मोटार सायकल चोर निघाले. त्यांना पकडणाऱ्या पोलिस कर्मचार्याचा सत्कार पोलिस निरीक्षक मारुती थोरात यानी केला.
गोकुंदा ग्रामपंचायत हद्दीतील पेटकुले नगर येथे दिनांक १२ ऑक्टोंबर रोजी रात्री एक वाजून १५ मिनिटांनी एका घराच्या आडोशाला ओल सावलीत दबा धरून बसलेल्या चोरास रात्री गस्तीवर असलेले पोलीस सुनील गोपाळराव कोलबुद्धे यांनी पाहिले. पोलिस आल्याचे चोरांच्या लक्षात येताच पळ काढला . तेव्हां सुनील कोलबुद्धे आणि होमगार्ड तिरमनवार यांनी सिनेमा स्टाईल पाठलाग करून आरोपी १ )अक्षय मीटू गायकवाड वय तीस वर्ष राहणार माळवेत चौक बीड जि.बीड २ ) अंकुल रामप्रकाश पांडे वय वर्षे वीस राहणार कुई अकबरीया ता. जि .चिद्रकूट राज्य उत्तर प्रदेश यांना पकडून चौकशी केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही.
तेव्हां पोउनी पवार यांचे मदतीने ताब्यात घेतले.शेवटी आदल्या दिवशी एम .एच. २६ ए . डब्लू ६९०१ क्रमाका ची मोटर सायकल चोरल्याची कबुली दिली .ती गाडी ताब्यात घेऊन त्या चोरट्यांची अटकपूर्ववैद्यकीय तपासणी करून पोलीस निरीक्षक मारुती थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सुनिल गोपाळराव कोलबुद्धे यांच्या फिर्यादीवरून त्या दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पो.ना. चौधरी हे करत आहेत .पोलीस निरीक्षक थोरात यांनी पोलिस अधिकारी पोउनी पावर,पी एस.आय .सावंत आणि बीट जमादार पोलिस नाईक सुनिल कोलबुद्धे आणि होमगार्ड तिरमनवार यांचा सत्कार पोलिस स्टेशन किनवट येथे करण्यात आला यावेळी माजी न.अध्यक्ष साजिद खाँन , फिरोज भाई शेख फजल चव्हाण हे यावेळी उपस्थित होते .