नांदेड| येथील सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या काव्यपौर्णिमा कार्यक्रम मालेतील ४६ काव्यपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. काव्य पौर्णिमेच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण कवी तथा मंडळाचे उपाध्यक्ष नागोराव डोंगरे हे होते. तर राज्याध्यक्ष अनुरत्न वाघमारे, महासचिव पांडूरंग कोकुलवार, काव्य पौर्णिमेचे संकल्पक गंगाधर ढवळे, अतिथी कवी म्हणून ज्येष्ठ कवी शरदचंद्र हयातनगरकर, प्रेमकवी चंद्रकांत चव्हाण, मारोती कदम, भैय्यासाहेब गोडबोले, प्रकाश ढवळे यांची उपस्थिती होती.
सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या ४६ व्या काव्य पौर्णिमा कार्यक्रमाचे उद्घाटन सिद्धार्थनगर कंधार येथे पालम जि.परभणी येथील सुप्रसिद्ध गझलकार आत्तम गेंदे यांनी विचारप्रवर्तक गझल सादर करुन केले. त्यानंतर कवी राहुल जोंधळे, शरदचंद्र हयातनगरकर, भगवान आमलापुरे, अनुरत्न वाघमारे, चंद्रकांत ढवळे, नागोराव डोंगरे, पांडूरंग कोकुलवार, नाना गायकवाड, चंद्रकांत चव्हाण, मारोती कदम, साईनाथ रहाटकर, गंगाधर ढवळे यांनी एकापेक्षा एक सरस कविता सादर केल्या. काव्य पौर्णिमेचे संवादसूत्र अनुरत्न वाघमारे यांनी हाती घेतले. तर आभार भैय्यासाहेब गोडबोले यांनी मानले.
पहिल्या सत्रात उज्वल पुस्तकालय सिद्धार्थ नगर कंधार आयोजित कवी प्रकाश ढवळे लिखित 'उज्वल' या कवितासंग्रहाचे प्रकाशन मोठ्या थाटात संपन्न झाले. माजी नगराध्यक्ष रामराम पवार, कंधारपूर त्रैमासिकाच्या संपादिका रमाताई कठारे, भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय शिक्षिका सुजाता आढाव, आकाश प्रकाशन संस्थेचे प्रकाशक पांडूरंग कोकुलवार, आंबेडकरी समीक्षक तथा भाष्यकार गंगाधर ढवळे, कवी नागोराव डोंगरे, उज्वल कवितासंग्रहाचे कवी प्रकाश ढवळे, प्रगती कांबळे, पल्लवी कांबळे, मोहिनी कांबळे, रावसाहेब कांबळे, राजेश कांबळे, राजरत्न कांबळे आदी मान्यवरांच्या हस्ते कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले.
यावेळी कंधारचे माजी उपनगराध्यक्ष हमीद सुलेमान, सुधाकर कांबळे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष विलास कांबळे, शहराध्यक्ष निलेश गायकवाड, नामांकित पत्रकार राजेश्वर कांबळे, भारिपचे माजी तालुकाध्यक्ष दिलीप जोंधळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुधाकर सोनकांबळे, क्रांती वाहन चालक, मालक संघर्ष महासंघाचे तालुकाध्यक्ष माधव कांबळे, अॅड.मारोती सोनकांबळे, पत्रकार प्रल्हाद आगबोटे, समता सैनिक दलाचे तालुका उपाध्यक्ष संतोष दुंडे, माजी केंद्रप्रमुख डी.के.वाघमारे, गोलेगाव(प.क) चे माजी सरपंच काशिनाथ फुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष दत्ता कारामुंगे, नामदेव कांबळे, नाना गायकवाड, संजय सोनकांबळे, सुदाम मोडके, जितेंद्र ढवळे, बळीराम कांबळे, संभाजी ढवळे, शिवाजी ढवळे आदी उपस्थित होते.