मातासाहेब देवाजी यांच्या 340 व्या जन्मोत्सवास प्रारंभ
नांदेड| येथील गुरुद्वारा मातासाहेब देवाजी येथे रविवारी मातासाहेब देवाजी यांच्या 340 त्रिदिवसीय महान कीर्तन दरबार जन्मोत्सवास सुरुवात झाली. गुरुद्वारा तखत सचखंड श्री हजुरसाहेबचे मीतग्रंथी भाई गुरमीतसिंघजी यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी शिरोमणि पंथ अकाली बूढा दल 96 करोड़ी चे जत्थेदार बाबा मानसिंघजी, संतबाबा नरिंदरसिंघजी कारसेवावाले गुरुद्वारा श्री लंगर साहेब, संतबाबा बलविंदरसिंघजी कारसेवावाले गुरुद्वारा श्री लंगरसाहेब, जत्थेदार संतबाबा तेजासिंघजी मातासाहेबवाले (बूढा दल 96 करोड़ी), जत्थेदार संतबाबा दियालासिंघजी मुख्तियार-ए-आम, जत्थेदार संतबाबा सरवनसिंघ अकाली निहंगसिंघ, जत्थेदार संतबाबा गज्जनसिंघ, जत्थेदार संतबाबा गुरदेवसिंघजी (तरना दल), जत्थेदार बाबा मानसिंघ गुरुनानक दल मड़ीवाले, बाबा तारासिंघजी झाडसाहेबवाले, बाबा सिन्छासिंघजी तरना दल भिखी विंड, जत्थेदार तरसेमसिंघ महिताचौक, सुखपालसिंघ मालवा तरना दल, स. सेवकसिंघ मुख़्तियारएराम बूढा दल, ज्ञानी गुरपिंदरसिंघ हैड ग्रंथी बूढा दल, स. गुरमीतसिंघ बेदी व इतर संतांची प्रमुख उपस्थिती होती.
सुरुवातीला श्री गुरुग्रन्थसाहेबांसमक्ष जन्मोत्सव सोहळा प्रारंभ करण्याची अरदास करण्यात आली. यानंतर हुकुमनामा वाचन झाले. कीर्तन दरबार कार्यक्रमाची सुरुवात भाई मनिंदरसिंघ हजूरी रागी जत्था यांच्या शबद कीर्तन द्वारे करण्यात आली. तसेच श्री गुरुगोबिंदसिंघजी यांच्या पत्नी माता साहेबदेवाजी विषयी माहिती आधारित कथा करण्यात आली. ज्ञानी प्रभजीतसिंघ पटिआला यांनी कथा केली. भाई देविंदरसिंघ निर्माण, रागी जत्था दरबार साहिब अमृतसर यानी आपल्या कीर्तनाने मंत्रमुग्ध केले. ज्ञानी हरिंदरसिंघजी अलवरवाले श्रीगंगानगर राजस्थान यांनी एका तासाच्या प्रवचनात माता आणि पिता विषयीची कृतज्ञनता पाळण्याचे आवाहन केले. ज्ञानी लखविंदरसिंघ डाढी जत्था, संत बाबा जोगिंदर सिंघजी मोनी धार्मिक विद्यालय नांदेड यांनी धार्मिक कीर्तन कार्यक्रम सादर केले.
ज्ञानी हरिंदरसिंघ अलवरवाले यांनी माता साहेबदेवाजी यांच्या जन्मोत्सवास समर्पित प्रवचनात शीख धर्मातील मूळ शिकवणीत आई आणि वडिलांविषयीचे नाते कसे जपावेत त्याचे विवेचन सादर केलेत. ज्ञानी हरिंदरसिंघजी म्हणाले, आईच्या मातृत्वाचे कर्ज फेडणे अशक्य आहे तसेच पीत्याने केलेल्या त्यागाचे उपकार संतान कधीच परत करू शकत नाही. माता साहेबकौर ह्या खालसा पंथाच्या माता आहेत याचे सदैव स्मरण ठेवावे. गुरुद्वारा मातासाहेब येथे आज मोठ्या संख्येत भाविकांनी दर्शन घेतले. भाविकांसाठी भव्य लंगरप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.