भाविक भक्तांचे श्रद्धास्थान श्री इच्छापूर्ती कमलाक्तमिका देवी -NNL


नविन नांदेड|
श्री  ईच्छापुरती कमलाक्तमिका महालक्ष्मी मंदिर देवस्थान सिडको येथे दसरा ब्रम्होतसव निमित्ताने नवरात्र उत्सव मध्ये विवीध धार्मिक कार्यक्रमासह लहान मुलांसाठी स्पर्धा आयोजीत करून  वर्ष भर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन करूनभाविक भक्तांना नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. 

गेल्या २१ वर्षापूर्वी या मंदिराच्यी स्थापना करण्यात आली, सुरूवातीच्या काळापासून दैनंदिन महापुजा यासह विविध धार्मिक कार्यक्रम व महिला भाविकांसाठी भजन यासह अनेक कार्यक्रम आयोजित करून व लहान मुलांसाठी स्पर्धा व मैदानी खेळ आयोजित करून विद्यार्थ्यांचा  सप्त गुणांना वाव मिळवून दिला आहे. तर वर्धापनदिन निमित्ताने कार्यक्रम आयोजित केले आहेत. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दसरा ब्रम्होतसव निमित्ताने ७ ते १५ आक्टोबर पर्यंत विश्वस्त मंडळाच्या वतीने दैनंदिन महाभिषेक, पुजा, आरती यासह होम हवन व धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे.तर लहान मुलांसाठी स्पर्धा,व कब्बडी खो-खो स्पर्धे आयोजन करण्यात आले आहे.

मंदिराच्यी दैनंदिन पुजा करडीले परिवार हे करीत असुन विश्वस्त जनार्दन करडीले,शिवाजी गिराम, राजाळे,जाधव,अंमिलकंठवार,गुडु पवार,चोहाण,रामराव जाधव, मधुकर यन्नावार, राजेश देबडे, कऊटकर, हे परिश्रम घेत आहेत. ब्रमहोतसव निमित्ताने भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. दसरा निमित्ताने सकाळी महाअभिषेक नंतर भाविक भक्तांसाठी मंदीर दर्शनासाठी खुले करण्यात येणार असून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी