आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी घेतले माता कालिंकेचे मनोभावे दर्शन
हिमायतनगर, अनिल मादसवार| गतवर्षी नवरात्रोत्सव काळात तीर्थ क्षेत्र निधीतून मंजूर झालेल्या ४० लक्ष रुपयाच्या भव्य सभामंडपाच्या कामाला सुरुवात झाली आहे. या कामाची पाहणी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी पाहणी करून गुत्तेदारास लवकरात लवकर सभामंडपाचे काम पूर्ण करावे अश्या सूचना दिल्या आहेत. याव्यतिरिक्त मंदिराच्या संरक्षण भिंतीसाठी लवकरच निधी मंजूर करून आणणारा आहे. त्यामुळे त्यामुळे नवसाला पावणाऱ्या माता कालिंका मंदिर विकास कामासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असे आश्वासन आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी मंदिर कमिटीला दिले.
त्यांनी दि.१३ रोजी नवसाला पावणाऱ्या माता कालिंका मातेच्या मंदिरास भेट देऊन मनोभावे दर्शन घेतले. तसेच देशातून कोरोनाचे संकट टाळू दे आणि पूर्ववत सर्वाना जीवन जगण्याची संधी मिळून सुख समृद्धी आणि दीर्घायु लाभू दे अशी मनोकामना मातेकडे केली. यावेळी मंदिर कमिटीच्या वतीने आमदार जवळगावकरांचा स्वागत करण्यात आले. यावेळी जवळगावकर म्हणले कि, मातेच्या कृपाशिर्वादामुळेच मला पुनर्जीवन मिळाले आणि मी मला पुन्हा आमदार म्हणून जनसेवेचे संधी मिळाली. माझ्या मागील काळात आणि आजच्या काळात होईल तेवढ्या ठिकाणच्या धार्मिक स्थळाच्या जीर्णोद्धाराची कामे मारागी लावली आहेत. यापुढेही माझ्या जिवंत जीव असे पर्यंत जनसेवेसह धार्मिक स्थळाच्या विकासासाठी प्रयत्न सुरूच राहतील. महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांच्या माध्यमातून निधी अभावी कोणत्याही मंदिराचे काम अर्धवट थांबू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मंदिराच्या ४० बाय ९० अश्या भव्य सभामंडपाच्या बांधकामाची त्यांनी पाहणी केली. तसेच पूर्वी बांधकाम करण्यात आलेल्या छतातून पाणी येत सल्याचे समजल्याने वरील कळसासह छताची प्रत्यक्ष पाहणी २५ बाय २५ च्या छताची दुरुस्ती करून त्यावर २० x ३० चे भव्य शेड उभे करा. तसेच मंदिर कमिटीला विश्वासात घेऊन दर्जेदार पद्धतीने मंदिराच्या सभामंडपाचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना शासकीय ठेकेदार सुरेश पळशीकर याना दिल्या. यावेळी मंदिर कमिटीने मंदिराच्या विविध विकासकामासाठी आणखी जिद्धीची आवश्यकता असल्याचे सांगितले यावेळी त्यांनी लवकरच मंदिराच्याच्या सुरक्षा भिंतीसह मंदिरात होणाऱ्या लग्न सोहळे, यासह विविध कार्यक्रमांना अवश्यक असलेल्या पाकशाळेच्या इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत शहराध्यक्ष संजय माने, नाजीमचे माजी संचालक गणेश शिंदे, प्रथम नगराध्यक्ष अखिल भाई, माजी जी.प.सदस्य सुभाष राठोड, एन डी कदम, राहुल लोणे, याप्रसंगी कालिंका मंदिर कमेटीचे अध्यक्ष - राजेंद्र रामदिनवार, सचिव - संजय मारावार, ज्ञानेश्वर पंदलवाड, धर्मपुरी गुंडेवार, नारायण गुंडेवार, शरद चायल, जीवन घोगरकर, शिवाजी भंडारे, संजय बोड्डेवार आदींसह अनेकांची उपस्थिती होती.