नांदेड| तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात येत्या आश्विन पौर्णिमेनिमित्त १० आॅक्टोबर ते २ ० आॅक्टोबर या कालावधीत श्रामणेर दीक्षा घेऊ इच्छिणाऱ्या उपासकांसाठी दहा दिवसांचे श्रामणेर प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले असून २१ रोजी पौर्णिमोत्सव हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रशिक्षण केंद्राचे संचालक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी दिली.
ऋषीपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा येथे दसदिवशीय श्रामणेर प्रशिक्षण शिबीर होणार आहे. यात भदंत पंय्याबोधी थेरो यांच्यासह भंते चंद्रमणी, भंते धम्मकिर्ती, भंते सुदर्शन, भंते श्रद्धानंद, भंते सुनंद, भंते सुदत्त, भंते शिलभद्र, भंते संघमित्र, भंते सारीपुत्र, भंते शाक्यपुत्र हे नवदिक्षित श्रामणेरांना मार्गदर्शन करणार आहेत. शिबिरपूर्व नावनोंदणी करण्यासाठी भदंत पंय्याबोधी थेरो ८३०८८८७९८८, भंते श्रद्धानंद ९५७९२०९७५२, साहेबराव इंगोले ८१४९०२६०३४, गंगाधर ढवळे ९८९०२४७९५३ या क्रमांकावर संपर्क साधावा असे प्रशिक्षण केंद्राच्या वतीने कळविण्यात आले आहे.