नांदेड| उत्तरप्रदेशातील लखीमपुर खिरी या गावातील शेतकर्यांना केंद्रातील मंत्र्याच्या गाडीखाली चिरडून मारण्याचा निंदनीय प्रकार घडला आहे. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी दि.11 ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडी सरकारच्यावतीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या आंदोलनात सर्वांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी केले आहे.
उत्तरप्रदेशातील लखीमपुर खिरी या गावात केंद्रातील मोदी सरकारकडे शांततेच्या मार्गाने शेतकरी आंदोलन करीत होते. परंतू वेळोवेळी भाजपा सरकार आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. उत्तरप्रदेशातील लखमीपुर खिरी गावातील शेतकर्यांना केंद्रातील मंत्र्याने गाडीखाली चिरडून मारण्याचा प्रकार केला आहे हा प्रकार निंदनीय आहे. केंद्र सरकारच्या निर्दयी कृतीचा आम्ही निषेध करतो.
महाविकास आघाडी सरकारकडून सोमवारी महाराष्ट्र बंदचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी या आंदोलना संबंधी व शेतकर्यांवर झालेल्या अन्याया संबंधी सुचित केले आहे. तेव्हा जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष, कार्याध्यक्ष, शहर अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, सर्व फ्रंटल व सेलचे अध्यक्ष यांनी आपल्या तालुका स्तरावर महाराष्ट्र बंद आंदोलन यशस्वी करावे व या घटनेच्या निषेधा संदर्भात तहसिलदारांना निवेदन द्यावे असे आवाहनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर व नांदेड जिल्हा सरचिटणीस प्रा.डी.बी.जांभरूनकर यांनी केले आहे.