हिंगोली, दिनेश मुधोळ| हिंगोली जिल्ह्यात काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाचे आगमन झाले असुन शनिवार सायंकाळपासुन सुरू झालेला पाऊस रविवारी सकाळी साडेसहा वाजेपर्यंत सुरू होता.
या पावसामुळे शहराजवळुन वाहणारी कयाधु नदीला पुर आला आहे. दहा वाजेपर्यंत सूर्यदर्शन देखील झाले नव्हते. जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून पावसाने उघडीप दिली होती. यामुळे सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने सोयाबीन काढणीचे खोळंबलेली कामे पाऊस थांबल्यानंतर शेतकऱ्यांनी सुरू केली होती. मात्र शनिवारी सुरू झालेल्या पावसाने काढणी केलेले सोयाबीन झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली होती. दरम्यान जिल्ह्यात शनिवारी सकाळी काही वेळ रिमझिम पाऊस झाली. दिवसभर ढगाळ वातावरण होते.
सायंकाळी साडेसहा वाजता पाऊस झाला. रात्री दहा वाजेपर्यंत रिमझिम पाऊस झाला. परत मध्यरात्री पासून सुरू झालेला पाऊस रविवारी सकाळी साडेसहापर्यंत सुरू होता. दहा वाजेपर्यंत सुर्यदर्शन देखील झाले नाही. या पावसामुळे शहरा जवळुन वाहणारी कयाधु नदीला पुर आला आहे. हा पाऊस जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा व सेनगाव तालुक्यात सर्वदूर झाला आहे. यामुळे परत सोयाबीन काढणीची कामे खोळंबली असल्याचे शेतकरी सांगत आहेत.