सप्तरंगी साहित्य मंडळाकडून वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार -NNL


नांदेड|
पावसाळा असो की हिवाळा, भल्या पहाटे उठायचं. वर्तमानपत्राचे गठ्ठे ताब्यात घ्यायचे. कोण सायकलवरुन तर कोण चालत घरोघरी वर्तमानपत्र पोहोच करण्याचा नित्यक्रम पाळणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा १५ ऑक्टोबर हा सन्मान दिन म्हणून माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवसानिमित्त 'वृत्तपत्र विक्रेता दिन' म्हणून दरवर्षी साजरा केला जात आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या दृष्टीने हा कष्टाचा गौरव करणारा, अभिमानाचा दिवस आहे. येथील सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष अनुरत्न वाघमारे, महासचिव पांडूरंग कोकुलवार, कोषाध्यक्ष गंगाधर ढवळे, राज्य पुरस्कार प्राप्त माध्यमिक शिक्षक डॉ. हेमंत कार्ले, उद्धव वट्टमवार, भागवत गुडमेवार, निवृत्ती लोणे, डी. डी. गायकवाड आदींची उपस्थिती होती.

वृत्तपत्र विक्रेत्याला समाजात सन्मान मिळावा अशी अपेक्षाही सप्तरंगी साहित्य मंडळाने व्यक्त केली. इमानेइतबारे व्यवसाय करणारा ह घटक तसा उपेक्षित राहिला आहे. संघटनेच्या माध्यमातून वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विविध मागण्यासाठी त्यांचा सरकार दरबारी पाठपुरावा सुरू आहे. काही जणांची तिसरी, दुसरी पिढी वृत्तपत्र विक्रीच्या व्यवसायात आहेत. वडील, मुलगा आणि नातवंडे असे तीन पिढ्या व्यवसायात आहेत. सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या राज्य कार्यकारिणीच्या वतीने भावसार चौकात ज्ञानोबा नरवाडे, सुभाष थोरात (पवन नगर), विजय कल्याणकर ( शिवरोड परिसर) कामगार चौक तरोडा नाका येथे राजेश लोकरे, धर्माजी गुरुपवार ( चौफाळा ), शंकर लच्छेवार ( श्रीनगर ), शंकर लच्छेवार ( वर्कशॉप ), पत्रकार संदीप कटकमवार तर कॅनाल रोड परिसरात ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते बाबुराव थोरात यांचा सत्कार करण्यात आला. 

विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी, पेन्शन योजना लागू करावी, एसटी महामंडळाचा पास मिळावा, प्रत्येक जिल्ह्यात भवन बांधण्यासाठी जागा, सरकारने वृत्तपत्र विक्रेत्यांचा अपघात विमा उतरविला पाहिजे या काही वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मागण्या आहेत. वृत्तपत्र विक्रेता हा घटक दुर्लक्षित आहे. त्यांना सन्मानाची वागणूक मिळायला हवी. काहीजण वृत्तपत्र विक्रेत्यांचा 'एकेरी'उल्लेख करतात. प्रामाणिकपणाने काम करणारा हा वर्ग आहे. या घटकाकडे पाहण्याची समाजाची मानसिकता बदलायला हवी. त्यासाठी साहित्य मंडळाने शाल,  पुष्पहार , ग्रंथभेट देऊन वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान केला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी