लोहा| आर्य वैश्य समाजाच्या राज्य कार्यकारणी मध्ये लोह्याचे कर्तबगार माजी नगराध्यक्ष किरण वटटमवार यांनी सह कोषाध्यक्ष तर तरुण उद्योजक नामदेव कटकमवार यांची बांधकाम समितीवर निवड झाली आहे.
आर्य वैश्य समाज संघटनेत लोह्याचे भूमिपुत्र सेवानिवृत्त वन उपसंचालक गोविंद बिडवई यांचे प्रभावी कार्य सुरू आहे.यापूर्वी राज्य पातळीवर आपल्या कार्याची ओळख करून देणारे माजी नगराध्यक्ष किरण वटटमवार यांची राज्य कार्यक्रणीत सह कोषाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. लोह्याचे कर्तबगार नगराध्यक्ष म्हणून आजही त्याच्या कामाची शहरात व तालुक्यात चर्चा होत असते.सामाजिक व सार्वजनिक कामात प्रामाणिकपणे जीव ओतून काम करण्याची शैली आहे.शिवाय संघटन कौशल्य चांगले आहे.
लोह्यातील तरुण उद्योजक नामदेव कटकमवार यांचीही राज्य कार्यकरणीवर बांधकाम समितीत निवड झाली आहे. संगघटन व शासकीय पातळीवर काम करून घेण्याचे कौशल्य त्यांच्यात आहे.या निवडी बद्दल शहरात समाज बांधवांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर, ज्येष्ठ नेते केरबाजी बिडवई प्रवीण पाटील चिखलीकर, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल, हरिभाऊ चव्हाण, नगरसेवक दता वाले, प्रा.डी एम पवार, अध्यक्ष दिनेश तेल्लवार, बाळू सावकार पालीमकर, कांता बिडवई, यासह अनेकांनी याचे अभिनंदन केले आहे.