नायगाव। कोरोना काळात आपण अनेक चांगल्या व्यक्तींना गमावलो असून या संकटातून सुखरूपपणे जे बाहेर पडले आहेत त्यांना सुखरूप ठेवणारे डॉक्टर्स यांनी ही जीवाची बाजी लावली असल्याने या उदात भावनेपोटी कुंटूर येथे मराठी पत्रकार संघाचे सर्कल प्रमुख नागोराव पाटील भोसले यांनी आपले सहकारी सोबत घेऊन अनेकांचा कोरोना योद्धा म्हणून नुकत्याच घेण्यात आलेल्या कार्यक्रमात रुपेश देशमुख कुंटूरकर यांच्या अध्यक्षतेखाली सन्मान करण्यात आला.
मराठी पत्रकार संघ कुंटूर सर्कलच्यावतीने नागोराव पाटील भोसले यांच्या नेतृत्वाखाली येथील जिल्हा परिषद हायस्कूल सभाग्रह येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रुपेश देशमुख, उद्घाटक इंजि. राम मालेवाड, नवनिर्वाचित पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष नागेश पाटील कल्याण, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब पांडे, सूर्याजी पाटील चाडकर, डॉ. मुकुंदराव बेलकर, बाबुराव पा. आडकीने, ज्येष्ठ पत्रकार मतीन मुदखेडकर, पत्रकार संघाचे माजी तालुकाध्यक्ष माधवराव कोकुरले, पत्रकार संघाचे माजी तालुकाध्यक्ष माधव पाटील चव्हाण, सरपंच मारुती पाटील कदम, सामाजिक कार्यकर्त्या सौ. सोनालीताई हंबर्डे, सूर्यकांत पा. कदम, शिवाजी पा होळकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी महामानवाच्या प्रतिमेस पूजन करून अभिवादन केल्यानंतर मान्यवरांसह कोरोना काळात ज्यांचे मोलाचे योगदान असलेले डॉक्टर्स यांना कोरोना योद्धा व पूरग्रस्त मदत योध्दा आणि तालुक्यातील मराठी पत्रकार संघाच्या सर्व पत्रकार बांधवांचा कुंटूर सर्कल पत्रकारांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. दुसऱ्याचा सन्मान करणे हीच आपल्या कार्याची पावती आहे म्हणून गेल्या अनेक वर्षापासून समाजाप्रती सातत्याने काम करणारे, योगदान देणारे एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख आहे ते कुंटूर नगरीतील नागोराव पाटील भोसले यांनी सातत्याने आपल्या मनाचा मोठेपणा दाखवत कुंटूर नगरीत ऐतिहासिक कार्यक्रम राबवून त्यांनी यात कोरोणा योध्दा, पूरग्रस्तयोध्दा व सामाजिक कार्यकर्ते, विविध गावातील सरपंच पदाधिकारी यासह तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान कार्यक्रम त्यांनी घडवून आणला आहे. सत्कार मूर्तीने हा सन्मान स्वीकारल्यानंतर भारावून जाऊन. पत्रकार भोसले पाटील यांचे तोंड भरून ज्यानी त्यांनी कौतुक करू लागले.
सध्या देशावर विविध प्रकारचे संकटे असल्याने त्यात आपण कित्येक व्यक्ती पासून दूर झालो आहोत म्हणून सर्वांचा सन्मान व्हावा हा मनात उद्देश गेल्या अनेक दिवसापासून होता .आपण विविध क्षेत्रातील सर्वांचा सन्मान करून आपल्या मनाचा मोठेपणा दाखविणे हेच आपले कर्तव्य ठरते. म्हणून हा कार्यक्रम माझ्या नेतृत्वाखाली करण्यात आला अशी प्रतिक्रिया नागोराव पाटील भोसले यांनी दिली.
आगामी काळात नागोराव पाटील भोसले हे जिल्हा परिषदची निवडणूक लढवून त्या माध्यमातून जनतेची सेवा करावी असे कित्येकांना अनेक हे दिवसापासून वाटत असले तरी भोसले हे निश्चितच निवडणुकीच्या रिंगणात उतरतील असे अनेकांनी मत व्यक्त केले आहे.