मौजे येडूद येथील विविध विकासकामांसाठी लाखोंच्या निधीची घोषणा
हिंगोली दिनेश मुधोळ| शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष बांगर यांच्या शुभहस्ते मौजे येडूद येथे १० लक्ष रुपये किंमतीच्या सभामंडपाचे भवानी मंदिर समोर मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले.
यावेळी मौजे येडूद गावच्या विकासासाठी जनसुविधा योजने अंतर्गत पाच लक्ष रुपयांचे पेवर ब्लॉक, दलित वस्ती योजने अंतर्गत सहा लाख रुपयांचे पेवर ब्लॉक, 2515 अंतर्गत पाच लक्ष रुपयांचा सीसी रोड, इत्यादी विकास कामांसाठी लाखो रुपयांच्या निधीची घोषणा आमदार बांगर यांनी केली. यावेळी आमदार महोदयांनी इतर भाविका समवेत पंगतीत बसून प्रसादाचा आस्वाद घेतला यावेळी जि.प. समाज कल्याण सभापती फकीरा मुंडे, युवा सेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम, जि.प. सदस्य डी.वाय. घुगे ,जि. प. सदस्य विठ्ठल राव चौतमाल, सरपंच कैलास घुगे, दिगंबर बांगर दिनकर बांगर सुरेश पवार गजानन घुगे वसंतराव घुगे एमडी सरकटे ज्ञानेश्वर घुगे गणपतराव घुगे दशरथ घुगे यांच्यासह मोठ्या संख्येने इतर मान्यवर उपस्थित होते.