हिमायतनगर,अनिल नाईक| शहरातून उमरखेडकडे जाणाऱ्या बोरी मार्ग रस्त्यावरील घारापुर फाटा ते हिमायतनगर या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्याने ये-जा करताना रस्त्यात खड्डा कि, खड्ड्यात रास्ता हेच काळात नसल्याने हा रास्ता मृत्यूचा सापळा बनला असल्याची प्रतिक्रिया वाहनधारक, शेतकरी पुढील गावाकडे जाणारे नागरिक करत आहेत. या खड्डेमय रस्त्याने कोणत्याही क्षणी दुर्घटना होण्याची शक्यात नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित बांधकाम विभागाने याकडे लक्ष केंद्रित करून प्रवाशी वाहनधारकांना सुरक्षेची हमी द्यावी अन्यथा नागरिक रस्त्यासाठी आंदोलनाच्या तयारीत आहेत.
हिमायतनगर ते घारापुर रास्ता बनलाय मृत्यूचा सापळा; दुर्घटनेची शक्यता बळावली -NNL
नृसिंह न्यूज नेटवर्क
0