हिमायतनगर, अनिल नाईक| कारला गावातील अंतर्गत रस्त्याचे कामाचे उद्घाटन मंगळवारी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी सत्कार प्रसंगी बोलताना आ.जवळगावकर म्हणाले की येणाऱ्या काळात कारला पिचोंडी ग्रामपंचायत ला भरभरून निधी देणार असुन विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही असे मत व्यक्त केले आहे.
कारला येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत येताच गावात विकास कामेही जोमाने सुरू झाली असुन. मंगळवारी विविध रस्त्याचे उदघाटन आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले आहेत . यावेळी माजी जि.प.सदस्य सुभाष राठोड,माजी संचालक शेख रफिकभाई,सरपंच गजानन पाटील कदम,प्रा. डी. डी. घोडगे ,उपसरपंच रोशन धनवे, ग्रामविकास अधिकारी बालाजी पोगुलवाड,यांची प्रमुख उपस्थिती होती. गावकऱ्यांच्या वतीने आ.जवळगावकर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्रामस्थांशी बोलतांना आ. जवळगावकर म्हणाले की, कारला पिचोंडी येथील जनतेनी ग्रामपंचायत एकहाती देऊन जो विश्वास टाकला. त्याच प्रमाणे सरपंच सदस्यांनी गावातील जनतेच्या कामाला प्राधान्य द्यावे कुठल्याही अडचणी आल्यास मी आपल्या सोबत आहे. गावातील सार्वजनिक पाणी पुरवठ्यासह ग्रामपंचायत ईमारत चा प्रश्न लवकरच मार्गी लावणार असुन येत्या काळात ग्रामपंचायत ला कुठलाही निधी कमी पडणार नाही असे आश्वासन दिले आहे. यावेळी तंटामुक्त समिती अध्यक्ष डॉ.गफार,ग्रा.पं.सदस्य सोपान बोंपिलवार,रामेश्वर यमजलवाड, गजानन मिराशे, दत्ता चिंतलवाड, सौ.कल्पना घोडगे, बाबाराव डवरे, रामजी मिराशे, अ.रज्जाक भाई, वसंत मिराशे, लक्ष्मण चिंतलवाड, अगंद सुरोशे, आडेल चपलवाड, श्रीराम मुठेवाड, आनंद सुर्यवंशी, भिमराव लुम्दे, तुकाराम कदम, मधुकर घोडगे, नाथा चवरे, रामराव पाटील, भिमराव काबंळे, साहेबराव घोडगे, यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थितती होती.