नांदेड| महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यात "शिवसंपर्क" अभियाना अंतर्गत गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक. तसेच मुख्यमंत्र्यांचे कार्य घरोघरी पोहोचवा व प्रत्येक गावात शिवसेना सदस्य नोंदणी करण्याचे आव्हान केले आहे. त्यांच्या आदेशानुसार नांदेड उत्तर मतदार संघातील वाघी येथे शिवसेनेची शाखा स्थापन करून, ज्येष्ठ शिवसैनिकांचा व शाखाप्रमुखांचा सत्कार करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मोठया प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते.
वाघी येथील गावकऱ्यांनी आ. बालाजी कल्याणकर यांना वाघी ते सायाळ बायपास रस्ता दुरुस्ती करणे, रेल्वे ब्रिजचे काम लवकर चालू करून रस्ता मोकळा करून देण्यात यावा तसेच अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे सरसकट पंचनामे करण्याच्या सुचना तलाठ्यांना देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. आ. कल्याणकर यांनी गावकर्यांच्या समस्या ऐकून घेतल्या व तुमच्या सर्व मागण्या लवकरच पूर्ण करू असे गावकऱ्यांना आश्वासन दिले. यावेळी उपस्थित नांदेड उत्तर मतदार संघाचे आ. बालाजी कल्याणकर, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, तालुकाप्रमुख जयवंतराव कदम, सरपंच संघटनेचे जिल्हा समन्वयक नारायणराव कदम, युवा सेनेचे तालुका प्रमुख गजानन कदम, तालुका संघटक नवनाथ काकडे, धनंजय पावडे, श्याम पावडे.
उपतालुका प्रमुख संतोष भारसावडे, सर्कलचे प्रवक्ते माधव महाराज हिंगमिरे, सर्कल प्रमुख गणेश बोकारे, अशोक पावडे, गब्बू बोकारे,गणेश बोकारे, गोरखनाथ खराबे, शाखाप्रमुख हरिभाऊ भोसले, बाबा जानकर, ग्रामपंचायत सदस्य सत्यनारायण शर्मा, कोटीतीर्थ येथील शाखाप्रमुख राजू वाघमारे, नवीन हसापूर येथील शाखाप्रमुख बालाजी माने, सोमेश्वर येथील शाखाप्रमुख ज्ञानेश्वर बोकारे, गौरव बोकारे, बाळू बोकारे, सुदाम डक, पांडुरंग बोकारे ,गजानन बोकारे, यांच्यासह गावातील जेष्ठ नागरिक नारायण भोसले, बालाजीराव भोसले, प्रकाश जानकर, रामराव मेकाले, हिरामण धर्माले, रामदास भोसले, बालाजीराव जानकर, भीमराव भोसले, रामराव सुर्यवंशी, शिवानंद जानकर, माधव भोसले, विठ्ठल भोसले, अजय हनुमंते, संकेत जानकर, अमर हनुमंते, प्रेमराव जानकर, बंडू भोसले, भाऊराव जानकर यांच्यासहित शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका प्रमुख जयवंतराव कदम, तालुका संघटक नवनाथ काकडे, उपतालुकाप्रमुख संतोष भारसावडे ,सर्कल प्रमुख गणेश भोकरे, दीपक भोसले यांनी परिश्रम घेतले
