अतिपावसामुळे सोयाबीन, कापसासह ज्वारी, हळदही आली धोक्यात
हदगाव, शे .चांदपाशा| गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे पीक हातुन गेले होते. गेल्या दोनतीन दिवसापासुन संतताधर पाऊस पडत आहे. पावसाची केवळ रिपरिप सुरु आहे त्यामुळे नदी भरुन वाहत असून, नाल्यांना पुर आल्याने पुराचे पाणी शेतीत जाऊन सोयाबीन, कापूस यासह इतर पिके धोक्यात आली आहेत. एकूणच पिकाचे नुकसान झाले असले तरी शेतकरी माञ समाधानकारक पावसामुळे सुखवला आहे.

या बाबतीत तालुक्यातील पीकाचे नुकसानचा तहसिल कार्यालयमध्ये तलाठी मंडळनिरक्षक यांनी अहवाल पाठविलेला दिसुन येत नाही. माञ विशेष म्हणजे तालुक्याचे तहसिलदार तथा उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर यांनी हदगाव हिमायनगर उपविभागात नदी काठाच्या गावांना प्रत्यक्षात भेटी देवुन आढवा घेतला. विशेष म्हणजे बुधवार राञी पासुन पावसाला सुरुवात झाली. यामुळे हदगाव हिमायनगर रोडवरील पुल वाहुन गेल्यामुळे हिमायनगर तालुक्याचा संपर्क तुटला होता. हा मार्ग सुरळीत करण्यासाठी उपविभागीय अधिकारी भरपूर मेहनत घेतली आहे.
सोयाबीनवर किडीचा प्रादुर्भाव ..
या वर्षी वेळेवर पाऊस झाल्याने सोयाबीन्स उत्पादक शेतकरी खुश होते. माञ सोयाबीनचे पीक जमीनीच्यावर आल्याने 'खोडकिडकीने अँटक केल्याने शेतक-याना काळजीत टाकली आहे. यावर्षी पण सोयाबीनचे पीक हातुन जाते कि काय..? याची चिंता लागलेली आहे. पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु असुन, या पुर्वी शेतक-यानी सोयाबीन पेरण्यापुर्वी सर्व प्रकारच्या बीज प्रक्रिया करुनही सोयाबीन फुलाला लागताच किडीचा पार्दुभाव वाढयला लागला. आता जास्त पावसामुळे सोयाबीनचे पीकही पिवळे पडु लागले आहे. या मुळे सोयाबीनचे मोठेक्षेञ नष्ट होऊ लागले आहे.
परंतु या गभीर परिस्थितीकडे हदगाव कृषी विभागाचे पार दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे कृषि विभागाने सागितलेल्या उपाययोजना कुचकामी असल्याचे दिसुन येत आहे. खोडमाशीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून महागड्या किटकनाशकचा वापर केला तरी त्याचा उपयोग होताना दिसुन येत नाही. त्यामुळे खोडमाशीचा नाश करण्यासाठी नियंत्रण करणारी उपयोजना कृषि विभागाने आखणे गरजचे झाले आहे. पण बाधावर जाऊन सर्वसामान्य शेतक-याचे पीक पाहाणी करण्यासाठी या कृषि विभागाची माञमाणसिकता दिसुन येत नाही. यात्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने शेतक-याचे उत्पादन घटु शकते. या बाबतीत कृषि विभाच्या सँबधितानी मार्गदर्शन करण्याची गरज असल्याचे मत अनेक शेतक-यानी व्यक्त केलं आहे.
