शेकापच्या वत्तीने भाई आसद बल्की यांनी तहसिलदारांना दिले निवेदन ...
मुखेड, रणजित जामखेडकर| मुखेड शहरातील संभाव्य पुर सदृष्य परिस्थितीने होणाऱ्या जिवित व वित्तहानी टाळण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्यात याव्या यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे शहर अध्यक्ष आसद बल्खी यांनी मुखेड तहसीलदार काशिनाथ पाटील यांच्या मार्फत नांदेड जिल्हाधिकारी यांना शुक्रवारी निवेदन देण्यात आले .
यावर्षी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. तालुक्यातील अनेक तलाव / जलाशय १००% भरले असून सांडवा ओसंडून वाहत आहे. नदी / नाल्यांना पुर सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष मागील वर्षाचा आलेख पाहता शहरातील मोती नदीच्या परिसरातील वाल्मीकनगर, फुलेनगर भागातील अनेक घरात गतवर्षी पुराच्या पाण्याने हाहाकार माजविला होता. अनेकांच्या पाळीव जनावरे वाहून गेली. जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले. शासनाची कसलीच मदत पिडीतांना अजूनही मिळाली नाही. आपण सदर घटनास्थळी येऊन प्रत्यक्षात पाहणी केलेली आहे.
यावर्षी सुध्दा पाऊस जास्त होत असल्याने व आपण कोणतीही पुर्व उपाययोजना न केल्याने पुन्हा एकदा मोती नदी जवळील असलेल्या फुलेनगर, वाल्मीकनगर भागात पुराच्या पाण्याने नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. तरी आपण संभाव्य पुर सदृष्यपरिस्थितीने होणाऱ्या जिवित व वित्तहानी टाळण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात. शहरात अनेक ठिकाणी पावसाळ्यापूर्वी स्वच्छता न केल्यामुळे नाल्या कोंबल्या असून नाल्याचे घाण पाणी रस्त्याने व नागरिकांच्या घरात शिरुन नुकसान होत आहे. तात्काळ शहरातील कचऱ्याने बंद झालेल्या नाल्यांची साफसफाई करावी, शहरातील स्मशानभूमी व कब्रस्थान मध्ये झाडेझुडपे वाढले असून तेथे स्वच्छता अभियान राबवावे, स्मशानभूमी व कब्रस्थानात लाईटची व्यवस्था / पथदिवे तात्काळ बसविण्यात यावे.
उपरोक्त मागण्याकडे तात्काळ लक्ष देऊन नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यात यावे. अन्यथा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर जन आंदोलन करण्यात येईल. याची नोंद घ्यावी. असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर भाई एस के बबलु,भाई पांडुरंग लंगेवाड, सामाजिक कार्यकर्त रियाज शेख, भाई आसद बल्खी, हाफिज पठान,नईम सय्यद आदि ची स्वाक्षरी आहे.
